Corona virus; Pregnant woman should take care to prevent the outbreak; World Health Organization suggestions | corona virus ;प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्भवती महिलेने घ्यावी ही काळजी ; जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचना 

corona virus ;प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्भवती महिलेने घ्यावी ही काळजी ; जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचना 

पुणे : जगभर कोरोना विषाणू थैमान घालत आहे. या काळात गर्भवती महिलांनी आपली विशेष काळजी घेतली पाहिजे. आपली आणि वावरत असलेल्या घरात स्वच्छता ठेवा, हात सातत्याने स्वच्छ करावेत. एखाद्या महिलेस कोरोनाची लागण झाल्यास घाबरून न जाता तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. कोरोनापासून दूर राहण्यासाठी गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.  

१) गर्भवती महिलांना कोरनाची लागण होण्याचा धोका अधिक आहे काय?

गर्भावतींना कोरोनाचा अधिक धोका आहे की नाही याबाबत अजून खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. त्यावर संशोधन सुरू आहे. तसेच कोरोना चा गर्भवतीवर नक्की काय परिणाम होतो, या बाबत खूपच कमी माहिती उपलब्ध आहे. गर्भारपणाच्या काळामध्ये महिलेच्या शरीरामध्ये आणि प्रतिकारशक्तीतही बदल होत असतात. त्यामुळे श्वसना संबंधीचे आजार होण्याचा धोका असतो. ताप, सर्दी आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्यांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. 

२) गर्भावतींनी कोणती काळजी घ्यावी?

सॅनेटायझर अथवा साबणाने सतत हात धुवावा. गर्दीची ठिकाणे टाळावीत. डोळे, नाक आणि तोंडाला हाताचा स्पर्श होणार नाही याची दक्षता घ्यावी. नाक आणि तोंड झाकावे. 

3) गर्भवती महिलेला कोरोना असल्याचा संशय असल्यास, तिची चाचणी कशी करावी? 

गर्भवती महिलेची चाचणी प्राधान्याने करण्यात यावी. उलट त्यांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. 

४) मातेकडून मुलाला कोरोनाचा संसर्ग होतो का?

मातेकडून मुलाला कोरोनाचा संसर्ग होतो की नाही या बाबत अजून माहिती उपलब्ध नाही. मात्र गर्भजल अथवा मातेच्या दुधामध्ये कोरोना चे विषाणू आढळून आले नाहीत. 

५) गर्भवती महिलेला कोरोनाची बाधा झाल्यास काय काळजी घ्यावी?

गर्भवती महिलेची अतिशय काळजी घेतली जावी. गर्भार काळात आणि प्रसूती दरम्यान त्यांना अत्युच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे. महिलेवर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संवाद साधून त्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या पाहिजेत. रुग्णाची स्वच्छता राखली पाहिजे. रुग्णावर उपचार करणाऱ्या व्यक्तींनी संपूर्ण सुरक्षा पोषाख परिधान केला पाहिजे. माता आणि नवजात बालकाला सन्मानाची वागणूक दिली जावी.

६) कोरोना बाधित गर्भवती महिलेचे सिझेरियन करावे का? 

केवळ वैद्यकीय गरज असल्यास सिझेरियन केले जावे. महिलेचीच सिझेरियन करण्याची इच्छा असल्यासही सिझेरियन करता येईल. 

७) बाधित महिला नवजात अर्भकाला स्तनपान देऊ शकते का? 

बाधित महिला नवजात अर्भकाला स्तनपान देऊ शकते. त्यासाठी हाताची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. स्तनपान देताना मास्क घालावा. त्याच बरोबर लहानग्याला घेण्यापूर्वी हात स्वछ धुवावेत. आपण वावरत असलेली खोली सतत स्वच्छ करावी.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona virus; Pregnant woman should take care to prevent the outbreak; World Health Organization suggestions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.