कोरोना रुग्णांना आता एका गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या काय आहे 'थ्रोम्बोसिस'?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 07:43 PM2021-06-14T19:43:17+5:302021-06-14T19:45:03+5:30

कोरोना विषाणूच्या या साथीत अनेकांनी जीव गमावला तर काहीजण या कोरोनाविरूद्धचे युद्ध जिंकत आहेत. मात्र त्यांना इतर रोग उद्भवू लागले आहेत.

Corona patients now at risk of a serious illness, know what is 'thrombosis'? | कोरोना रुग्णांना आता एका गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या काय आहे 'थ्रोम्बोसिस'?

कोरोना रुग्णांना आता एका गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या काय आहे 'थ्रोम्बोसिस'?

Next

कोरोना विषाणूच्या या साथीत अनेकांनी जीव गमावला तर काहीजण या कोरोनाविरूद्धचे युद्ध जिंकत आहेत. मात्र त्यांना इतर रोग उद्भवू लागले आहेत. ज्या रुग्णांना मधुमेह झाला नाही, ते सुद्धा पोस्ट कोविडनंतर मधुमेहाच्या आजाराला बळी पडत आहे. कोरोनाचा हा आजार रोखण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत परंतु त्याचा उद्रेक अजूनही सुरू आहे. आता कोविडपासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये रक्त गोठण्याचा रोग होत असल्याचे आता समोर आले आहे. याला ब्लड क्लॉटिंग किंवा थ्रोम्बोसिस म्हणतात.

हा रोग काय आणि कसा होतो?
ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, कोविडनंतर दुर्मिळ रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका सामान्य व्यक्तींपेक्षा कोविड झालेल्या रुग्णांना तब्बल १०० पट जास्त असतो. तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मतानुसार कोरोना विषाणू शरीरात शिरल्यानंतर सूज यायला लागते.ज्याचा थेट परिणाम हृदयाचा ठोकाच्या गतीवर पडतो आणि हळूहळू शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात. याला रक्त गोठणे म्हणतात. रक्ताच्या गुठळ्यांमुळे, हृदय खूप कमकुवत होतं आणि त्याच्या क्षमतेनुसार कार्य करण्यास सक्षम नसतं, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

कोविड रूग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या का जमत आहेत?
जागतिक स्तरावर एक संशोधन करण्यात आले आहे ज्यामध्ये कोविड रुग्णांच्या १५ ते ३० टक्के रुग्णांमध्ये हा आजार झाल्याचे उघडकीस आले आहे. याला डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणतात. तज्ज्ञांच्या मते हा विषाणू फुफ्फुसांशी तसेच रक्ताशीही संबंधित आहे.

ब्लड क्लॉट्स कुठे तयार होतात?
कोविडवर सतत संशोधनानंतर असे दिसून आले आहे की कोविड रूग्णांपैकी जवळजवळ ३० टक्के लोकांना ही समस्या भेडसावत आहे. रक्त पेशी शरीरात आढळतात, त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या कुठल्याही भागात तयार होतात.


 

Web Title: Corona patients now at risk of a serious illness, know what is 'thrombosis'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य