शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

'या' फळाचा असा केला उपयोग तर मुतखड्यावर मिळतो आराम, लगेचच ट्राय करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 17:09 IST

लिंबू-पाणी आरोग्यासाठी विशेषतः उन्हाळ्यात फायदेशीर आहे. या सर्वांशिवाय अनेकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे उकळलेले लिंबू पाणी अनेक रोगांशी लढण्यासाठी प्रभावी ठरू (Boiled Lemon Water Benefits) शकते.

लिंबू सहसा प्रत्येकजण खात असतो. जेवणाची चव वाढवण्यापासून ते अन्न पचवण्यासाठी आणि उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी लिंबाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. निरोगी राहण्यासाठी अनेकजण आपल्या आहारात लिंबू-पाण्याचा समावेश करतात. लिंबू-पाणी आरोग्यासाठी विशेषतः उन्हाळ्यात फायदेशीर आहे. या सर्वांशिवाय अनेकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे उकळलेले लिंबू पाणी अनेक रोगांशी लढण्यासाठी प्रभावी ठरू (Boiled Lemon Water Benefits) शकते.

खरं तर, लिंबू हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी तसेच कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस आणि फोलेट अ‌ॅसिडचा एक चांगला स्रोत आहे. हेल्थलाइनच्या माहितीनुसार, वजन कमी करण्यात आणि मुतखड्यावरही ते प्रभावी असल्याचे आढळले आहे. आज आपण उकडलेल्या लिंबू पाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

उकडलेले लिंबू पाणी कसे सेवन करावे -एका भांड्यात अर्धा लिंबू एक ग्लास पाण्यात उकळवा. साधारण पाच मिनिटे उकळल्यानंतर ते थंड होण्यासाठी ठेवा. हे पाणी तुम्ही मीठ किंवा मधाव्यतिरिक्त काहीही न घालता तुमच्या आवडीनुसार पिऊ शकता. रस पिळून सोबतच त्याची सालदेखील उकळून पिणं चागलं. या हेल्दी पेयाने तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता. मात्र, लक्षात असू दे की, लिंबाचा रस जास्त प्रमाणात प्यायल्यास त्यामुळे त्वचेची अ‌ॅलर्जी आणि खाज सुटू शकते. त्यामुळे दररोज किती प्रमाणात लिंबाचा रस घेणे योग्य आहे, याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच पिणं योग्य ठरेल.

लिंबू-पाणी उकळून पिण्याचे त्वचेला फायदे -लिंबू पाणी उकळून प्यायल्याने त्वचेतील बॅक्टेरिया कमी होतात. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि डागरहित दिसतो. व्हिटॅमिन सी समृद्ध असल्याने, उकळलेले लिंबू पाणी अँटी-ऑक्सिडंट म्हणून कार्य करते, ज्यामुळे त्वचेतील मुक्त रॅडिकल्स कमी होऊन त्वचा चमकते.

उच्च रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त -उकळलेले लिंबू पाण्याचे सेवन रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत करते. यामध्ये असलेले कॅल्शियम आणि पोटॅशियम उच्च रक्तदाब सामान्य पातळीवर आणण्याचे काम करतात. यासाठी आपल्याला हवे असल्यास लिंबाचा रस मिसळून ब्लॅक टी देखील पिऊ शकता.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते -उकळलेले लिंबू पाणी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. व्हायरल इन्फेक्शन सारख्या आजारांशी लढण्यासाठी हे प्रभावी आहे. तसेच, यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास आणि प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रभावी -उकळलेले लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. लिंबू पाणी मधासोबत सेवन केल्याने शरीरातील चरबी झपाट्याने कमी होते आणि शरीर हायड्रेटही राहते.

पचनक्रिया सुधारते -अनेक वेळा असंतुलित आहार घेऊनही पचनक्रिया बिघडते आणि बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, पोटदुखी अशा अनेक समस्या पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत रोज सकाळी रिकाम्या पोटी उकळलेले लिंबू पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते.

मुतखड्यावर गुणकारी -लिंबू पाणी प्यायल्याने मुतखड्यामध्ये कॅल्शियम ऑक्सलेटचा प्रभाव कमी होतो. हे ऑक्सलेट हार्ड डिपॉझिटच्या स्वरूपात उद्भवते, ज्यामुळे वेदना, मळमळ आणि उलट्या होतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स