स्ट्रॉबेरी खाणं महिलेला असं पडलं महागात; एक्स-रे पाहून डॉक्टरही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 01:32 PM2019-09-24T13:32:54+5:302019-09-24T13:33:12+5:30

तुम्हाला स्ट्रॉबेरी आवडते का? आवडत असेल आणि तुम्ही पोटभर स्ट्रॉबेरी खात असाल तर जरा जपून खा. कारण आवडीने स्ट्रॉबेरी खाणं एका महिलेला फारच महागात पडलं आहे.

Australia woman hospitalised after needle found in strawberry | स्ट्रॉबेरी खाणं महिलेला असं पडलं महागात; एक्स-रे पाहून डॉक्टरही हैराण

स्ट्रॉबेरी खाणं महिलेला असं पडलं महागात; एक्स-रे पाहून डॉक्टरही हैराण

Next

(फोटो प्रातिनिधीक)

तुम्हाला स्ट्रॉबेरी आवडते का? आवडत असेल आणि तुम्ही पोटभर स्ट्रॉबेरी खात असाल तर जरा जपून खा. कारण आवडीने स्ट्रॉबेरी खाणं एका महिलेला फारच महागात पडलं आहे. या महिलेने चुकूनही विचार केला नसेल की, तिची हिच आवड तिला एक दिवस मृत्यूच्या दारात उभं करेल. 

मेलबर्नमध्ये राहणाऱ्या एका महिलेने स्ट्रॉबेरी खाल्या आणि काही वेळातच तिच्या घशामध्ये असह्य वेदना सुरू झाल्या. काही वेळातच वेदना एवढ्या वाढल्या की, तिला काही बोलणंही शक्य नव्हतं. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिला त्वरित रूग्णालयात दाखल केलं. 

महिलेच्या काही प्राथमिक तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी लगेचच तिच्या घशाचा एक्स-रे केला. एक्स-रेमध्ये जे समोर आलं त्यामुळे अनेकजण हैराण झाले. डॉक्टरांनी महिलेकडे तिने काय खालं होतं याची चौकशी केली तेव्हा महिलेने आपण स्ट्रॉबेरी खाल्याचे त्यांना सांगितले. खरं तर महिलेने स्ट्रॉबेरीसोबतच एक सुई गिळली होती. तिच सुई महिलेच्या घशात अडकली असून त्यामुळेच तिला घशामध्ये असह्य वेदना होत होत्या. 

एनडीटिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मेलबर्नमध्ये राहणारी स्काई विल्सन राइट आपल्या पति आणि मुलांसोबत आपाल 30वा बर्थडे सेलिब्रेट करत होती. यादरम्यान केकवर लावण्यात आलेली स्ट्रॉबरी स्काईने उचलून खाल्ली. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्काईच्या वडिलांनी घडलेल्या घटनेबाबत बोलताना सांगितले की, त्यांच्या मुलीला स्ट्रॉबेरी खाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांनी सांगितलं की, स्ट्रॉबेरीच्या आतमध्ये सुई होती. मुलीने नकळत स्ट्रॉहेरीसोबत सुईही खाल्ली. जेव्हा तिला याबाबत समजलं तेव्हा ती हैराण झाली. आम्ही तत्काळ तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तेव्हा डॉक्टरांनी तिचा एक्स-रे केला आणि त्यामध्ये घशामध्ये सुई अडकल्याचे दिसून आलं.'

(टिप : वरील गोष्ट आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Australia woman hospitalised after needle found in strawberry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.