छातीत दुखणं ठरू शकतं जीवघेणं, एंजायनामुळे येणारा हार्ट अटॅक टाळण्याासाठी वापरा 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 11:31 AM2020-05-01T11:31:24+5:302020-05-01T11:32:46+5:30

यात धमन्या आकुंचन पावतात आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.

Angina pain chest pain symptoms causes and treatment myb | छातीत दुखणं ठरू शकतं जीवघेणं, एंजायनामुळे येणारा हार्ट अटॅक टाळण्याासाठी वापरा 'हे' उपाय

छातीत दुखणं ठरू शकतं जीवघेणं, एंजायनामुळे येणारा हार्ट अटॅक टाळण्याासाठी वापरा 'हे' उपाय

googlenewsNext

छातीत सतत वेदना होणं हे सर्वसामान्य लक्षणं नसून कालांतराने ही समस्या जीवघेणी सुद्धा ठरू शकते. छातीत दुखणं आणि वेदना होणं हे एंजानया रोग म्हणजेच हृदयाच्या आजारांचा संकेत असू शकतो. या लक्षणांना सहजरित्या कोणीही ओळखू शकत नाही. यात धमन्या आकुंचन पावतात आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. आज आम्ही तुम्हाला एंजायना रोगाचे लक्षणं आणि उपायांबाबत सांगणार आहोत. 


एंजायनाचे प्रकार

एंजायना  दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकार स्थिर आणि दुसरा प्रकार अस्थिर एंजायनाचा आहे. स्थिर एंजायना हा प्रकार सामान्य लक्षणांप्रमाणेच असतो. वेळीच  लक्षणांना ओळखून डॉक्टरांशी संपर्क साधल्यास तुम्ही या आजारातून बरे होऊ शकता. अस्थिर एजांयनामध्ये छातीत दुखायला सुरूवात होते. एंजायनामुळे हार्ट अटॅकचा धोका सुद्धा उद्भवण्याची शक्यता असते. 

लक्षणं

छातीत दुखणं

डोकेदुखी

हात, पाय, मासपेशींमध्ये तीव्र वेदना

छातीत जळजळ होणं

धमन्या आकुंचन पावणं

उपाय

एजांयना पासून लांब राहायचं असेल तर धुम्रपान करू नका, चांगला आहार घ्या, दररोज व्यायाम करा. वजन नियंत्रणात ठेवा. ताण- तणाव घेऊ नका, घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही या आजारांना स्वतःपासून लांब ठेवू शकता.

टॉमेटोही हृदयासाठी फायदेशीर असतो . टॉमेटोमधून व्हिटामीन सी मिळते. टॉमेटोमध्ये लाइकोपीनचे प्रमाण भरपूर असते. व्हिटामीन सी आणि एंटीऑक्सीडेंट्स असल्यामुळे हृदयाला फायदाच होतो.

अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅट्स आणि अण्टिऑक्सिडेंटचे प्रमाण अधिक असते. दिवसाला एक अक्रोड खाल्ल्यास हृदयाचे विकार फारसे होत नाहीत.

लसूण खाल्याने पोटासंबंधीच्या समस्या उद्भवण्यास आळा बसतो. त्याचबरोबर बॅक्टरिया नष्ट होण्यास मदत होते. उच्च रक्तदाब असल्यास रिकाम्या पोटी लसूण खाणे फायदेशीर ठरेल. लसणाच्या सेवनाने रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते आणि त्याचबरोबर हृदयासंबंधीत आजार होण्याचा धोका कमी होतो. कोलेस्ट्रॉलची समस्या असल्यास लसूण खाणे फायदेशीर ठऱते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. (हे पण वाचा-खुषखबर! आता लक्षणं नसतानाही डिटेक्ट होणार कॅन्सर; जाणून घ्या, कसा?)

हळदीचे पाणी हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. त्यामुळे रक्त गोठत नाही आणि रक्त साफ होण्यासही मदत होते. त्याशिवाय रक्ताच्या धमन्यांमध्येही रक्त साठत नाही. हळदीचे पाणी प्यायल्याने रक्ताची गुठळी होत नाही. ( हे पण वाचा-CoronaVirus News : शरीरातील रक्त गोठण्याचं कारण ठरत आहे कोरोना, 'या' औषधांनी होऊ शकतो बचाव)

Web Title: Angina pain chest pain symptoms causes and treatment myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.