Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:29 IST2025-10-08T11:29:10+5:302025-10-08T11:29:39+5:30
Cough Syrup : लहान मुलांना कफ सिरप देणं सुरक्षित आहे का? असा प्रश्न आता पालक विचारत आहेत.

फोटो - AI फोटो
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे अनेक मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. लहान मुलांना कफ सिरप देणं सुरक्षित आहे का? असा प्रश्न आता पालक विचारत आहेत. एम्स दिल्ली येथील बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. पंकज हरी यांनी या गंभीर मुद्द्यावर महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, जर कफ सिरपमध्ये भेसळ नसेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिलं गेलं तर त्यामुळे नुकसान होत नाही.
तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय लहान मुलांना सिरप देणं अत्यंत धोकादायक असू शकतं. बहुतेक कफ सिरपमध्ये आढळणारं Dextromethorphan Hydrobromide हे औषध एक सामान्य आणि सुरक्षित घटक आहे. हे औषध खोकला थांबवतं आणि किडनीवर त्याचा कोणताही वाईट परिणाम होत नाही.
मुलांना कफ सिरप कधी द्यावं?
कफ सिरपचे दोन प्रकार आहेत
- Cough Suppressant - कोरडा खोकला झाला असेल तर द्यावं.
- Decongestant - नाक बंद झालं असेल किंवा वाहत असेल तर द्यावं
- नवजात बाळांना आणि लहान मुलांना हे सिरप देऊ नयेत.
अमेरिकेत, डॉक्टर हे सिरप ४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना लिहून देत नाहीत. भारतात, समस्या अशी आहे की ही औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध असतात, जी चुकीची आहे. जर तुमच्या डॉक्टरांनी ते स्पष्टपणे लिहून दिले असेल तरच सिरप खरेदी करा. अन्यथा मुलांना देऊ नका.
"पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
ओव्हरडोसचे दुष्परिणाम
जर कफ सिरप जास्त प्रमाणात दिलं तर...
- मुलाला झोप येऊ शकते
- सुस्ती येते
- चक्कर येते
- हृदयाला त्रास होतो
- उलट्या आणि मळमळ होऊ शकते
भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
मुलांसाठी योग्य डोस काय?
मुलांना त्यांच्या शरीराच्या वजनानुसार (मिलीग्राम प्रति किलोग्राम) सिरप दिलं जातं. साधारणपणे, ०.५ ते १ मिलीग्राम प्रति किलोग्राम दिलं जातं, दिवसातून तीन वेळापेक्षा जास्त नाही. सिरप देण्यासाठी बाटलीसोबत येणाऱ्या डोसिंग स्पूनचा वापर करा. चमचा किंवा टेबलस्पूनने सिरप दिल्याने ओव्हरडोस होऊ शकतो. जर मूल ४ वर्षांपेक्षा कमी वयाचे असेल आणि डॉक्टरांना सिरप देणे आवश्यक वाटत असेल, तर त्यांनी डोस स्पष्टपणे लिहावा.
"लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
"कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
कफ सिरप खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात
सिरपमध्ये Dextromethorphan, Phenylephrine आणि Pheniramine सारखे घटक असतात. नेहमी ब्रँडेड आणि लेबल केलेलं सिरप खरेदी करा. स्वस्त आणि लेबल नसलेलं सिरप टाळा, कारण त्यात Diethylene Glycol नावाचे विषारी सॉल्व्हेंट असू शकतो. हा घटक किडनीटं नुकसान करू शकतो, तर Dextromethorphan सुरक्षित आहे.