शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
5
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
6
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
7
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
8
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
9
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
10
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
11
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
12
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
13
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
14
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
15
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
16
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
17
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
18
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
19
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
20
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
Daily Top 2Weekly Top 5

अन्न व औषध प्रशासनाच्या ३१ टक्के जागा रिकाम्या

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

मुंबई : राज्यभरातील सर्व नागरिकांना चांगल्या प्रतीची औषधे, अन्न मिळावे. या दोन्हींमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासन कार्यरत असते. हा सर्व कारभार पाहण्यासाठी जितक्या कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे, त्यापैकी ३१ टक्के जागा भरल्या नसल्याची माहिती उजेडात आली आहे.

मुंबई : राज्यभरातील सर्व नागरिकांना चांगल्या प्रतीची औषधे, अन्न मिळावे. या दोन्हींमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासन कार्यरत असते. हा सर्व कारभार पाहण्यासाठी जितक्या कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे, त्यापैकी ३१ टक्के जागा भरल्या नसल्याची माहिती उजेडात आली आहे.
अन्न व औषध प्रशासन राज्यभर कार्यरत असते. अनेक ठिकाणी पाहणी करून, धाडी टाकून भेसळयुक्त साहित्य जप्त केले जाते. या प्रशासनात विविध विभागांमध्ये मिळून एकूण १ हजार १७६ पदे आहेत. या पदांपैकी ३६५ पदे रिक्त आहेत. म्हणजे ३१ टक्के कमी कर्मचारी असताना प्रशासन राज्याचा कारभार सांभाळत आहे. राज्यात अन्नात भेसळ होऊ नये, चांगल्या दर्जाचे अन्न सगळ्यांना मिळावे, यासाठी अन्न सुरक्षा अधिकार्‍यांची २६५ पदे आहेत. यापैकी ७८ पदे रिक्त आहेत. याचाच अर्थ १८७ अन्न अधिकारी राज्यभराचा कारभार सांभाळत आहेत. औषध निरीक्षकांची १६१ पदे मंजूर आहेत. पण यापैकी फक्त १२४ पदे भरलेली आहेत. ३७ पदे रिक्तच आहेत.
एकूण रिक्त पदांचा विचार केल्यास असे दिसून येते की, ८११ कर्मचारी कार्यरत आहेत. म्हणजेच राज्याच्या लोकसंख्येचा विचार केल्यास, १ लाख ३५ हजार व्यक्तींमागे फक्त एक प्रशासनाचा कर्मचारी कार्यरत आहे. अन्न विभागात सहायक आयुक्तांच्या ६२ पदांपैकी २२ पदे रिक्त आहेत. औषध विभागात वैज्ञानिक अधिकार्‍यांच्या ३५ पैकी १३ जागा रिक्तच आहेत. तर वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांच्या ८ जागांपैकी चारच जागा भरल्या गेल्या आहेत. सहायक आयुक्तांच्या ५१ पैकी २२ जागा रिक्त आहेत. यामुळे असलेल्या कर्मचार्‍यांवर कामाचा जास्त ताण पडत आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांच्या १२ पैकी ९, नमुना सहायक यांच्या ६० पैकी २३ जागा रिक्त असून, अथक सेवा संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातंर्गत मागविलेल्या कागदपत्रातून ही बाब समोर आली आहे.
..................
(चौकट)
अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख कार्यालय मुंबईच्या वांद्रे ृ- कुर्ला संकुलात आहे. ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सांगली, सातारा, नागपूर आणि लातूर इत्यादी ३१ जिल्ह्यांत कार्यालये आहेत.