शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या मागणीसाठी जि.प. शाळेला ठोकले कुलूप

By admin | Updated: March 17, 2017 01:36 IST

शिक्षकाची बदली न करता रिक्त असलेल्या पदांवर शिक्षकाची नियुक्ती करावी या गावकऱ्यांच्या व शाळा समितीच्या मागणीकडे

अधिकाऱ्यांची पाठ : विद्यार्थ्यांनी झाडाखाली केले ज्ञानार्जन साखरीटोला : शिक्षकाची बदली न करता रिक्त असलेल्या पदांवर शिक्षकाची नियुक्ती करावी या गावकऱ्यांच्या व शाळा समितीच्या मागणीकडे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याने अखेर गावकऱ्यांनी रामपूर येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेला गुरूवारी (दि.१६) कुलूप ठोको आंदोलन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर असलेल्या झाडाखाली बसून ज्ञानार्जन करावे लागले. आमगाव पं.स. अंतर्गत जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा रामपूर (पानगाव) येथे पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. मात्र त्या मानाने शिक्षक कमी आहेत. असे असताना सुद्धा सहायक शिक्षक हेमने यांच्या बदलीचा आदेश शिक्षण विभागाने काढला. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी शिक्षक हेमने यांची बदली न करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी आमगाव यांना निवेदन दिले. तरीसुद्धा त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. तसेच स.शिक्षक टांगशे हे शाळेत नेहमी गैरहजर असतात. विद्यार्थ्यांना बरोबर शिकवित नाही तसेच नशेत राहतात, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. अशा शिक्षकाची बदली करावी व त्या जागी दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी केली. कुलूप ठोकण्याची माहिती मिळताच क्षेत्राचे जि.प. सदस्य जियालाल पंधरे यांनी शाळेला भेट दिली. आंदोलनात शाळा समितीचे अध्यक्ष शोभेंद्र मेंढे, उपसरपंच दुर्वास दोनोडे, ग्रा.पं. सदस्य शालीक चामलाटे, चंद्रसेन बिसेन, लक्ष्मण राणे, नंदू मेंढे, टेकराम बहेकार, पालिकराम दोनोडे, योगराज तरोणे, प्रकाश दोनोडे, दिपा देवगिरे, इंद्रकला ब्राम्हणकर, पुष्पा दोनोडे, प्रेम कोरे तसेच गावकरी सहभागी झाले होते.