शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांना प्राप्त होतेय गतवैभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

ग्रामीण भागातील पालकांचा कल खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे असल्यामुळे दोन वर्षापूर्वी पालक आपल्या पाल्यांची नावे जिल्हा परिषदेत दाखल न करता त्यांना खासगी शाळांमध्ये दाखल करायचे. कॉन्व्हेंट संस्कृतीतून आपल्या पाल्यांना वाढविण्याचा त्यांचा मानस दिसून येत होता. यामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक तुकड्या बंद होऊ लागल्या, शिक्षक अतिरिक्त ठरू लागले आहेत.

ठळक मुद्देयंदा १०१२ विद्यार्थी वाढले : विद्यार्थ्यांनी धरली पुन्हा शाळेची वाट

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खासगी शाळा व इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे मागील काही वर्षात विद्यार्थ्यांचा कल वाढला होता. खासगी शाळांच्या तुलनेत जि.प.शाळांतील भौतिक सुविधा मिळत नाही किंवा शिक्षणही देऊ शकत नाही असा पालकांचा गोड गैरसमज होता. परंतु हा गैरसमज आता दूर होऊ लागला आहे. पटसंख्येअभावी बंद होणाऱ्या जि.प.च्या शाळांना आता नवसंजीवनी आणि जुने वैभव प्राप्त होत असल्याचे चित्र आहे. यंदाची परिस्थिती पाहता जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत १ हजार १२ विद्यार्थ्यांचा अधिक जि.प.शाळेत प्रवेश झाला आहे.ग्रामीण भागातील पालकांचा कल खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे असल्यामुळे दोन वर्षापूर्वी पालक आपल्या पाल्यांची नावे जिल्हा परिषदेत दाखल न करता त्यांना खासगी शाळांमध्ये दाखल करायचे. कॉन्व्हेंट संस्कृतीतून आपल्या पाल्यांना वाढविण्याचा त्यांचा मानस दिसून येत होता. यामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक तुकड्या बंद होऊ लागल्या, शिक्षक अतिरिक्त ठरू लागले आहेत.ह्या सर्व बाबींना लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता सुधाण्यासाठी व भौतिक सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न केलेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात आला.लोकसहभागातून शाळा डिजिटल करून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची साथ दिली. अवांतर वाचनासाठी वाचन प्रेरणा दिन, वाचन कुटी, आनंददायी शिक्षणासाठी ज्ञानरचनावाद ही संकल्पना पुढे आणली. गोंदिया जिल्ह्याने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमात जिल्ह्याचे नाव लौकीक केले.परिणामी येथील जिल्हा परिषदेच्या शाळांतील शैक्षणिक वातावरण पाहून पालकांनी यंदा आपल्या पाल्यांचे नाव जिल्हा परिषदेच्या शाळांतच दाखल करण्याची तयारी दर्शविली.गोंदिया जिल्ह्याच्या आठही तालुक्यांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढत असल्याची गोड बातमी पुढे आली आहे. सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पहिल्या वर्गात ८ हजार १५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.परंतु यंदा याच शाळांमध्ये ९ हजार १६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १ हजार १२ अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्गात प्रवेश घेतला आहे.तिरोडा तालुक्यात सर्वाधिक वाढजिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी संपूर्ण शिक्षण विभाग जोमाने कामाला लागला आहे.होणाऱ्या विविध उपक्रमामुळे आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ लक्षात घेऊन खासगी शाळांतील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांत परतल्याचे उदाहरण गोंदिया जिल्ह्यात आहे. यंदा पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांंची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त आहे. त्यात तिरोडा तालुक्यात २०९ बालके, सडक-अर्जुनी तालुका १८२ बालके, देवरी १५४, गोरेगाव १२९, आमगाव ११४, सालेकसा १११, गोंदिया ८३ व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३० बालकांनी मागील वर्षीच्या तुलनेत अधिक प्रवेश घेतला आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांतून विद्यार्थ्यांचा होणारा सर्वांगीण विकास,भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे गोंदिया जिल्ह्यातील जि.प.शाळांचा दर्जा सुधारला आहे. हे सर्व पालक आपल्या डोळ्यांनी पाहात असल्यामुळे गावातूनच आपला मुलगा घडेल यासाठी पालकांनी आपल्या पाल्याचे नाव जि.प. शाळांत दाखल केले आहे.- राजकुमार हिवारेप्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प.गोंदिया.

टॅग्स :Schoolशाळा