काठीने मारून जखमी केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:34 IST2021-09-04T04:34:44+5:302021-09-04T04:34:44+5:30

.......................... दगडाने मारून जखमी केले गोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या कुऱ्हाडी येथील २ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता रामकृष्ण ...

Wounded with a stick | काठीने मारून जखमी केले

काठीने मारून जखमी केले

..........................

दगडाने मारून जखमी केले

गोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या कुऱ्हाडी येथील २ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता रामकृष्ण सोनवाने (६५) यांनी आरोपीला तु माझ्या घराकडे पाहून हात इशारे का करतोस, असे बोलले असता आरोपीने भांडण करून गमछ्यात दगड बांधून दगड डोक्यावर मारले. गोरेगाव पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३२४ अन्वये नोंद करण्यात आला आहे. पोलीस हवालदार किरसान तपास करीत आहेत.

...................

लघुशंका करणाऱ्याला मारहाण

गोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या बबई येथील देवुल यादवराव वैदय (२४) यांच्या सोबत जागेसंदर्भात असलेल्या वादामुळे १ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता यादवराव वैद्य लघुशंका करण्यासाठी गेले असतांना आरोपीने आमच्या घराच्या समोर लघुशंका का केली म्हणून त्यांना लाथाबुक्क्यानी डोक्यावर, छातीवर व तोंडावर मारून जखमी केले. गोरेगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ३२४, ३४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पोलीस हवालदार वानखेडे तपास करीत आहेत.

...................

Web Title: Wounded with a stick