कार्यकर्त्यांनी येत्या निवडणुकीसाठी सज्ज व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 05:00 AM2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:09+5:30

निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी घ्यायची असेल तर आपापल्या क्षेत्रातील लोकांच्या अडीअडचणी लक्षात घेवून त्यांना सहकार्य करावे. असे काम करुन काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येत्या निवडणुकीसाठी सज्ज व्हावे असे प्रतिपादन आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.

The workers should be ready for the coming elections | कार्यकर्त्यांनी येत्या निवडणुकीसाठी सज्ज व्हावे

कार्यकर्त्यांनी येत्या निवडणुकीसाठी सज्ज व्हावे

Next
ठळक मुद्देसहषराम कोरोटे : जिल्हा काँग्रेस कमिटीने केला सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मला आमदारकीच्या निवडणुकीत भरपूर आशिर्वाद देऊन जनतेने विधानसभेत पाठविले. त्यामुळे मला खऱ्या अर्थाने त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे अधिकार मिळाले. अशाचप्रकारे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी घ्यायची असेल तर आपापल्या क्षेत्रातील लोकांच्या अडीअडचणी लक्षात घेवून त्यांना सहकार्य करावे. असे काम करुन काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येत्या निवडणुकीसाठी सज्ज व्हावे असे प्रतिपादन आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी (दि.१८) आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे होते. याप्रसंगी सत्कारमुर्ती आमदार सहषराम कोरोटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव योगेंद्र भगत, जिल्हा उपाध्यक्ष पी.जी.कटरे, अनिल गौतम, जिल्हा महासचिव रत्नदीप दहिवले, आमगाव तालुकाध्यक्ष नटवरलाल गांधी, सालेकसा तालुकाध्यक्ष वासुदेव चुटे, तिरोडा तालुकाध्यक्ष राधेलाल पटले, गोरेगाव तालुकाध्यक्ष देवेंद्र रहांगडाले, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, आमगाव तालुका महिलाध्यक्ष उषा भेंडारकर, महिला सामाजिक कार्यकर्ता सीमा कोरोटे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने नवनिर्वाचित आमदार कोरोटे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून पक्षाचे जिल्हाध्यक्ष कटरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रदेश महासचिव भगत यांनी मांडले. संचालन करून आभार जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष आलोक मोहंती यांनी मानले.

Web Title: The workers should be ready for the coming elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.