शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुलाचे काम थंडबस्त्यात

By admin | Updated: February 4, 2015 23:17 IST

मागील चार महिन्यांपासून गोंदिया जिल्ह्यासाठी तयार होणाऱ्या क्रीडा संकुलाचे बांधकाम थंडबस्त्यात आहे. शासकीय अधिकारी व संकुल तयार करणारे कंत्राटदार यांच्यातील समन्वयाच्या

गोंदिया : मागील चार महिन्यांपासून गोंदिया जिल्ह्यासाठी तयार होणाऱ्या क्रीडा संकुलाचे बांधकाम थंडबस्त्यात आहे. शासकीय अधिकारी व संकुल तयार करणारे कंत्राटदार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळेच सदर काम रखडल्याचे सांगण्यात येत आहे. क्रीडा संकुलाच्या बांधकामास २ जुलै २०१२ रोजी सुरूवात झाली. त्यावेळी सदर काम पूर्ण करण्याचा कालावधी १ जुलै २०१४ ठरविण्यात आला होता. सद्यस्थितीत या क्रीडा संकुलाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. हे काम तीव्र गतीने करण्यात आले तर दोन महिन्यांत पूर्ण होवू शकते. क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी सांगितले की ३१ मार्चपर्यंत क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करण्याचा आदेश कंत्राटदाराला देण्यात आला आहे.क्रीडा संकुल तयार करणारे सुपर कंस्ट्रक्शनचे संचालक सुरेश पटले यांनी सांगितले की, संकुलाचे काम निधी न मिळाल्याने थांबलेले आहे. तसेच संकुल कमिटी एकेक खेळांचे काम पूर्ण करा, असे सांगते. मात्र सन २०१२ मध्ये करारनामा करतेवेळी अशी अट ठेवण्यात आली नव्हती.या नवीन अटीमुळे त्यांना कामात असुविधा होत आहे. जर त्यांना आजच निधी उपलब्ध करून देण्यात आला तर ते ६० दिवसाच काम पूर्ण करून देतील. क्रीडा संकुलाच्या आत पॅव्हेलियन, इंडोर गेम हॉल व स्विमिंग पुलाचे अधिक काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण मैदानात मातीचे लहान-सहान ढेप ठेवलेले आहेत. त्यांना पसरवून धावपट्टी (रनिंग ट्रॅक) व आऊटडोर खेळ मैदान बनविण्यात येणार आहे. विद्युत जोडणी नसल्यामुळे कामांना पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. कंत्राटदार व क्रीडा अधिकारी यांच्यात समन्वय असते तर अडचणी आल्या नसत्या. क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी विद्युत जोडणीसाठी ९० लाख रूपये देवूनही क्रीडा समिती व कंत्राटदार यांच्यात समन्वयाची अत्यंत गरज आहे.क्रीडा संकुलासाठी पर्याप्त निधी असतानाही चार महिन्यांपासून विविध अडचणींमुळे काम रखडले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी रखडलेल्या क्रीडा संकुलाच्या कामास सकारात्मक विचाराने गती दिली तर जिल्ह्यातील खेळाडू निश्चितच लाभान्वित होतील. (प्रतिनिधी)