शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोच्या मजुरांना मिळणार रेशीम लागवडीचे काम

By admin | Updated: October 21, 2014 22:53 IST

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे कार्य करणाऱ्या मजुरांना आता रेशीम उत्पादनासाठी रोपट्यांच्या (तुती) लागवडीचे काम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे रेशीम उत्पादनात वाढ होईल.

गोंदिया : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे कार्य करणाऱ्या मजुरांना आता रेशीम उत्पादनासाठी रोपट्यांच्या (तुती) लागवडीचे काम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे रेशीम उत्पादनात वाढ होईल. या लागवडीच्या कार्याच्या माध्यमातून शासनाद्वारे गोंदिया जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील ग्रामीण भागातील भूमिहीन, अल्पभूधारक, मागास वर्गातील मजूर व शेतमजुरांना रोजगार मिळणार आहे.रोहयोचे काम करणाऱ्या मजुरांचे हित व रेशीम उत्पादन करण्याच्या उद्देशाने शासनाने रोहयोच्या मजुरांना रेशीमसाठी रोपटे लागवडीचे कार्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांच्या ग्रामीण भागातील भूमिहीन व अल्पभूधारकांना रोजगार मिळेल व त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होवू शकेल. या प्रकारे रेशीम उत्पादकांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांची मजुरी शासनाच्या माध्यमातून मिळेल. त्यामुळे आता विनाखर्च कोस उत्पादन मिळेल. याशिवाय झाडे लावा झाडे जगवा या नितीच्या माध्यमातून पर्यावरण संतुलित ठेवण्यास मदतच होणार आहे. रेशीमची शेती कृषी आधारित रोजगार निर्मित करणारा व्यवसाय आहे. रेशीम उत्पादकांना एक एकर जागेत लागवड करण्यासाठी २८० ते ३०० मजुरांची आवश्यकता असते. शेतकऱ्यास एक एकर तूती बागेतून ४० ते ५० हजार रूपयांचा लाभ मिळतो. परंतु शासनाच्या नवीन धोरणानुसार, ग्रामीण भागातील मागास वर्गातील मजूर, शेतमजूर, अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थ्यांना रोहयोच्या अंतर्गत गावातच रोजगार मिळेल.पूर्वी रोहयोअंतर्गत नाले, नवीन रस्ते, लहान-मोठे तलाव, फळबाग योजना आदी काम होत असल्यामुळे कृषी कामासाठी मजुरांचा अभाव निर्माण होत होता. त्यामुळे शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. आता ही समस्या दूर होईल. आता कृषी कामासाठी मजुरांचा तुटवडा निर्माण होणार नाही व जिल्ह्यात रेशीम उत्पादनात वाढ होईल. (प्रतिनिधी)