शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी तर ८० कोटी लोक पाच किलो धान्यासाठी रांगेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 17:11 IST

कन्हैयाकुमार : महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ गोंदिया येथे सभा

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : भारतीय अर्थव्यवस्था तीन ट्रिलियनची झाली असून जगात तिसऱ्या स्थानी असल्याचे मोदी सरकार सांगत आहे. अर्थव्यवस्था बळकट होत असेल तर ही खरच आनंदाची बाब आहे; पण हे खरे आहे तर भारतातील ८० कोटी लोक ५ किलो मोफत धान्यासाठी रांगेत का, हा विरोधाभास नेमका कशामुळे आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे नव्हे तर आपल्या जवळच्या मित्रांचे हित साधल्याने असल्याची टीका एनएसयुआयचे अखिल भारतीय प्रभारी कन्हैयाकुमार यांनी केली.

महाविकास आघाडीतील काँग्रेसचे गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी (दि.१५) शहरातील भीमनगर मैदानावर आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. कन्हैयाकुमार म्हणाले, संविधानाने तुम्हाला मतदानाचा सर्वात मोठा अधिकार दिला आहे. हा अधिकार झोपडीत व बंगल्यात राहणाऱ्यांना सुध्दा सारखाच असून हीच खरी संविधानाची ताकद आहे. त्यामुळे तुम्ही केवळ मतदार नाही तर भविष्य घडविणारे आहात. जीवनात एखादी चूक झाली तर ती त्वरित सुधारता येते पण मतदानाच्या वेळी तुम्ही चूक केली तर त्याची शिक्षा ही पाच वर्ष तुम्हाला भोगावी लागते. महाराष्ट्रात होत असलेली निवडणूक ही महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाची आहे. त्यामुळे सजग राहून मतदान करून महायुती नव्हे महापापी सरकारला धडा शिकवा. महाराष्ट्रात सत्ता कोणाची हे गुजरातचे व्यापारी ठरवू शकत नाही, ते येथील मतदारच ठरविणार हे भ्रष्ट महायुती सरकारला दाखवून द्या, असे आवाहन कन्हैयाकुमार यांनी केले.

पक्ष फोडणारे जनतेचे कसेमहाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य व संताची भूमी म्हणून ओळखले जाते. पण भाजपने येथे पक्ष फोडून कुटुंबात कलह निर्माण करण्याचे काम केले. खा. शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्या ह्यातच त्यांच्या पक्षाचे चिन्ह चोरले, कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पक्ष फोडून घरात फूट पाडणारे जनतेचे कसे होऊ शकतात, असा सवालही कन्हैयाकुमार यांनी यावेळी केला.

त्यांनी महाराष्ट्राला डाग लावला ५० खोके घेऊन पक्षाशी गद्दारी करणारे ते आमदार नव्हे तर गद्दार होत. त्यांनी केवळ पक्षाशी नव्हे तर संविधान आणि महाराष्ट्राच्या संस्कृती, अस्मितेशी गद्दारी केली. अशी गद्दारी करून त्यांनी महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीला डाग लावण्याचे काम केल्याची टीका कन्हैयाकुमार यांनी केली.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kanhaiya kumarकन्हैय्या कुमारgondiya-acगोंदिया