शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

केव्हा येणार गोरेगाववासीयांचे ‘अच्छे दिन’ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 6:00 AM

गेल्या एक वर्षापासून सदर रस्ता बांधकामाला सुरुवात झाली आहे. डांबरीकरणाचा रस्ता उखडल्यावर रस्त्यावर मुरुम टाकण्यात आले. मुरुमाची दबाई करण्यात आली. पुन्हा मुरुम काही जागेवरुन काढून परत दबाई करण्यात आली. एकच काम वारंवार झाले व त्यामुळे सदर रस्ता बांधकाम करताना नियोनजाचा अभाव दिसला.

ठळक मुद्दे१५ दिवसांपासून रस्ता बांधकाम बंद : रखडलेल्या राज्यमार्गाची दशा

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : गोरेगाव-गोंदिया मार्गावर अच्छे दिनाचे स्वप्न पाहणाऱ्या जनतेला चांगले रस्ते तर मिळाले नाहीच त्याऐवजी चिखलातून ये-जा करण्याचे संकट अनुभवाला आले. आजघडीला रखडलेल्या गोरेगाव-गोंदिया राज्यमार्गाची दशा पाहण्यासारखी आहे. गेल्या १५ दिवसांपासून सदर रस्ता बांधकाम बंद असल्याची माहिती आहे.गोरेगाव- गोंदिया रस्ता बांधकामाचे वेळोवेळी चुकलेले नियोजन आणि कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा हेच सदर रस्ता रखडल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहे. विशेष म्हणजे, रहदारीस कच्चा रस्ता तयार करण्यात आल्यावर त्या रस्त्याची वेळोवेळी डागडुजी करणे बंधनकारक असताना गोरेगाव येथील पेट्रोल पंपाच्या पुढे पडलेले मोठमोठे भगदाड कंत्राटदाराच्या कार्यशैलीवरच प्रश्न चिन्ह निर्माण करणारे आहे.गेल्या एक वर्षापासून सदर रस्ता बांधकामाला सुरुवात झाली आहे. डांबरीकरणाचा रस्ता उखडल्यावर रस्त्यावर मुरुम टाकण्यात आले. मुरुमाची दबाई करण्यात आली. पुन्हा मुरुम काही जागेवरुन काढून परत दबाई करण्यात आली. एकच काम वारंवार झाले व त्यामुळे सदर रस्ता बांधकाम करताना नियोनजाचा अभाव दिसला. रस्ता बांधकामाच्या वेळी बरेच वाहन रस्त्यावर अडकून अपघातही झाले. मात्र याची दखल कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने घेतलेली दिसत नाही.जानाटोला- गोंदिया राज्यामहामार्ग सर्वात जास्त वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावर शासकीय गाड्या, बस, मोटारसायकल २४ तास फिरकत असतात. पण रखडलेल्या रस्ता बांधकामामुळे या रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.अपघातात झाली वाढगोरेगाव-गोंदिया रस्ता बांधकामामुळे अनेक वाहनचालक त्रस्त असताना अनेकांचे वाहन अडकल्याचे चित्र आहे. अनेक वाहनचालकांना अडकलेल्या वाहनांना काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला. यात क्रेनने वाहन काढण्याचा खर्चाचा भुर्दंड वाहनचालकाला बसला. मात्र वाहन फसल्यामुळे मागे-पुढे राहणाºया वाहनांना तासनतास जागावे लागले, हे विशेष.रस्ता झाला उंचजानाटोला ते गोंदिया रस्त्याची उंची पूर्वी पेक्षा जास्त झाल्यामुळे अनेकांनी विरोध केला आहे. हिरडामाली, गोरेगाव, तुमखेडा येथील उंच रस्त्यामुळे अनेकांचे घर दबले व त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास पावसाळ्यात अडचण झाली. पुढे भविष्यात संपूर्ण रस्ता तयार झाला तर पाण्याची विल्हेवाट कशी होईल हा प्रश्न रस्त्यावर घर असणाºया घरमालकांना सतावताना दिसतो.व्यवसाय बंदरस्त्याचे बांधकाम सुरू झाल्यापासून व्यवसायावर अवकळा आली आहे. आता सवारी व्यवसायात दम उरलेला नाही. अलीकडेच सवारी गाडी सुरू केली, पण रस्त्यावरील खड्डे व चिखलामुळे गाडीत कुणी बसत नाही.-जाफर साखरे, ऑटोचालक

एक वर्षापासून गाडी बंदरस्त्याचे बांधकाम सुरू झाल्यापासून व्यवसायात आमच्या मंदी आली आहे. ऑटोत झटके लागत असल्यामुले प्रवासी गाडीत बसत नाही. त्यामुळे वर्षभरापासून गाडी बंद आहे.- मनोज शेंडे, ऑटोचालकशेतकऱ्यांच्या अडचणीत भरउंच रस्ता बांधकामामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतात जाने कठीण झाले. तीन ते पाच फूट उंचीच्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचे काम करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक