शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा विद्यार्थी व पालकांची प्रशासन फसवणूक करते

By admin | Updated: May 31, 2014 23:36 IST

शासकीय कार्यक्रमांतर्गत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात शाळा तेथे प्रमाणपत्र मोहीम राबविण्यात आली. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे विद्यार्थ्यांना वर्ष लोटूनही

आमगाव :  शासकीय कार्यक्रमांतर्गत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात शाळा तेथे प्रमाणपत्र मोहीम राबविण्यात आली. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे विद्यार्थ्यांना वर्ष लोटूनही प्रमाणपत्रासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.विद्याथ्यार्ंच्या भवितव्याशी निगडित आवश्यक प्रमाणपत्रासाठी नेहमीच तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांची वर्दळ असते. विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, क्रिमिलेयरसाठी शासकीय कार्यालयांची पायपीट करावी लागते. परंतु शासकीय कार्यालाद्वारे कधी ही वेळेवर प्रमाणपत्रांची पूर्तता विद्यार्थ्यांंना करण्यात येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना अडचणींना समोरे जावे लागते. प्रमाणपत्राशिवाय शाळा महाविद्यालयांमध्ये आरक्षणात मोडणार्‍या विद्यार्थ्यांंना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. शासनाने नवीन संकल्पनाचा पुढाकार घेत शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंना शासकीय कार्यालयांमध्ये प्रमापत्रासाठी अडचण निर्माण होऊ नये म्हणून शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रमाणपत्र बनविण्यासाठी नियोजित कार्यक्रम नियंत्रण ठेवून तालुक्यातील ठरावीक शाळांमध्ये प्रमाणपत्रासाठी शिबिर घेण्यात आले. विद्यार्थी पालकांना आवश्यक प्रमाणपत्र शाळेतच उपलब्ध होत असल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करुन आवश्यक खर्च भागवून प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केला. प्रशासकीय स्तरावर राबविण्यात आलेली मोहीम यशस्वीपणे पुर्ण झाल्याचा गाजावाजा अधिकार्‍यांनी करुन घेतला. परंतु ज्या प्रमाणपत्रासाठी अर्ज स्वीकृत करुन घेतली त्या प्रमाणपत्रांचा वर्ष लोटूनही थांगपत्ता लागला नाही. विद्यार्थी  व पालकांनी अर्ज देऊनही प्रमाणपत्र मिळत नसल्याने तहसिल कार्यालयात पायपीट सुरू केली. परंतु संबंधित कर्मचार्‍यांनी प्रमाणपत्र मिळालेच नसल्याची माहिती दिली तर अर्ज केल्यास उपविभागीय अधिकारी देवरी यांच्याशी संपर्क करा, असा उलट सल्ला देण्यात आला. त्यामुळे राबविण्यात आलेल्या मोहिमेतून प्रशासनाने विद्यार्थी व पालकांची फसवणूक केल्याची जाण आता समोर येत आहे. (शहर प्रतिनिधी)