शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियाचे तापमान किती?

By admin | Updated: March 27, 2015 00:33 IST

उन्हाळा सुरू होऊन उकाडा वाढत आहे. पूर्वी जिल्ह्याचे तापमान मोजण्यासाठी शासकीय अधिकृत कार्यालय तहसील कार्यालय परिसरात होते.

गोंदिया : उन्हाळा सुरू होऊन उकाडा वाढत आहे. पूर्वी जिल्ह्याचे तापमान मोजण्यासाठी शासकीय अधिकृत कार्यालय तहसील कार्यालय परिसरात होते. मात्र ती इमारत पाडण्यात आल्याने तापमान मोजण्याची पर्यायी व्यवस्था कोठे करण्यात आली, याबाबत नागरिकांत तर्कवितर्क केले जात आहे. मार्च महिन्यात सुरूवातीला अवकाळी पावसाच्या आगमनाने जिल्ह्यातील वातावरणात गारवा निर्माण झाला होता. याचा नागरिकांना व शेतकऱ्यांना फटका बसला असला तरी लोकांनी गारव्याचा अनुभव घेतला. मात्र मार्च महिन्याच्या उत्तरार्धात आता पुन्हा उष्णतेने परिणाम दाखविने सुरू केले. मात्र गोंदिया जिल्ह्याचे तापमान मोजण्याची सोय किंवा व्यवस्था कुठे करण्यात आली, याबाबत शासकीय अधिकाऱ्यांना माहिती नसल्याचे दिसून येते. गोंदिया तहसील कार्यालय परिसरातून पूर्वी तापमानाची नोंद घेतली जात होती. त्याद्वारे जिल्ह्याचे तापमान नागरिकांना कळत होते. परंतु चार महिन्यांपूर्वी सदर इमारत पाडण्यात आली. मग तापमानाची अधिकृतपणे नोंद घेण्याची शासकीय व्यवस्था कुठे करण्यात आली, असे विचारल्यावर संबंधित अधिकारीच टाळाटाळीची उत्तरे देत आहेत. याचा अर्थ जिल्ह्याच्या तापमानाची नोंद कुठे होते, याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच नाही व चार महिन्यापासून जिल्ह्याचे तापमानच बेपत्ता आहे, असे होते. (प्रतिनिधी)