शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअँपच्या नादात जुने खेळ झाले हद्दपार

By admin | Updated: November 11, 2014 22:43 IST

१५ वर्षांच्या पूर्वीचा काळ आठवल्यास मैदानात मुलांचे सुरू असलेले खेळ, प्रत्येकाच्या घरावर डौलाने मिरविणारा एन्टीना, पाच-दहा-पंचेवीस पैशांची नाणी आणि त्यातून मिळणारा आनंद, हे चित्र दिसत होते.

गोंदिया : १५ वर्षांच्या पूर्वीचा काळ आठवल्यास मैदानात मुलांचे सुरू असलेले खेळ, प्रत्येकाच्या घरावर डौलाने मिरविणारा एन्टीना, पाच-दहा-पंचेवीस पैशांची नाणी आणि त्यातून मिळणारा आनंद, हे चित्र दिसत होते. पण सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात हे सर्व खेळ व वस्तू लुप्त झाल्याचे चित्र आहे. या वस्तूंच्या आठवणी ताज्या करण्याकरिता आज केवळ चित्र आणि फोटोच उरले आहेत. यातही मोबाईलच्या माध्यमातून त्या आठवणी ताज्या होत असल्याचे दिसते. सध्या व्हॉट्सअँप या अप्लीकेशनच्या माध्यमातून हे जुने फोटो एकमेकांना पाठवून तो काळ पाहिलेले युवक व वृद्ध जुन्या आठवणींना उजाळा देत असल्याचेच दिसून येत आहे. १० ते १५ वर्षांपूर्वी मैदानातील खेळांना अनन्यसाधारणमहत्त्व होते. यात सर्वच खेळांचा समावेश होत असला तरी सध्या केवळ क्रिकेट हाच खेळ चिमुकले खेळताना दिसतात. पूर्वी गिल्ली-दंडा हा खेळ मुलांमध्ये प्रसिद्ध होता. हल्ली हा खेळ कुठेही खेळला जात नसून त्यासाठी मैदानेही नाही, हे वास्तव आहे. लगोरी, लंगडी या खेळांचा प्रकार असलेला सातघर हे खेळ मुलींमध्ये त्या काळी प्रसिद्ध होते. सध्या मुलं-मुली प्रगत झाल्यागत वागत असल्याने हे जुनाट खेळ खेळले जात नाही. पूर्वी गल्ली-बोळात खेळले जाणारे लगोरी, लंगडी हे खेळ आता दिसेणासे झाले आहेत. आता मुला-मुलींमध्ये संगणक, मोबाईलवरील खेळांसह टीव्हीवरील व्हीडीओ गेम अधिक प्रसिद्ध झाले आहेत. बसल्या जागेवर खेळले जाणारे हे खेळ मुले खेळतात. यात शरिराला कुठलाही व्यायाम होत नाही. उलट विकार वाढण्यास आणि शारिरीक विकास खुंटण्यास हे खेळ कारणीभूत ठरत आहेत. मानसिकरित्या नवीन पिढी प्रगत घडत असली तरी दिवसेंदिवस शारीरिकदृष्टया दोष असलेली मुले-मुली अधिक आढळून येत आहेत. मुलांमध्ये गिल्ली-दंड्यासह भोवरा हा खेळही मोठाच प्रसिद्ध होता. एकट्यानेही तो खेळता येत होता आणि चार-चौघे जमले तर त्यात धम्माल असायची. पण सध्या प्लास्टीकचे भोवरे बाजारात मिळतात. या भोवऱ्यांना दोराने फिरवावेही लागत नाही. त्यासाठी तत्सम यंत्रही मिळते. यातही शरीराला व्यायामासाठी कुठेच वाव नाही. विविध आजारांवर औषध म्हणून काम करणारे खेळच लुप्त होत असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. शाळांमध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल यासह अन्य खेळ खेळविले जात असून स्पर्धाही घेतल्या जातात. तेवढाच विद्यार्थ्यांना व्यायाम होतो; पण या मातीतील खेळातून होणारी कसरत बंद झाल्याचे चित्र आहे. हल्ली मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपवरच गतकाळातील मुला-मुलींच्या विविध खेळांतील गमती-जमती आणि आठवणी ताज्या होत असल्याचे दिसून येते. मित्र आपले ग्रुु तयार करून जुन्या आठवणी शेयर करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)