शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहाला होतोय टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: February 4, 2015 23:17 IST

क्षेत्रातील आदिवासी मुलींना राहण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून आदिवासी विभागातर्फे मुख्यालयाच्या ठिकाणी प्रत्येकी अडीच कोटी रुपये खर्चुन दोन वसतीगृहांचे बांधकाम करण्यात आले आहे.

देवरी : क्षेत्रातील आदिवासी मुलींना राहण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून आदिवासी विभागातर्फे मुख्यालयाच्या ठिकाणी प्रत्येकी अडीच कोटी रुपये खर्चुन दोन वसतीगृहांचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु सुरूवातिपासूनच या वसतीगृहात पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे व विभागीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आजही या वस्तीगृहाला सकाळी व सायंकाळी खाजगी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.सन २०१२ मध्ये निर्माण करण्यात आलेल्या या वसतीगृहाला जनप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे उद्घाटनाकरीता तब्बल दोन वर्ष वाट पाहावी लागली. अखेर १० जानेवारी २०१४ मध्ये खासदार मारोतराव कोवासे व माजी आमदार रामरतन राऊत यांच्या हस्ते या वसतीगृहाचे उद्घाटन करण्यात आले. परंतु उद्घाटनकरुन त्याचे श्रेय लाटणाऱ्या जनप्रतिनिधिंनी या वस्तीगृहाच्या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले. तसेच विभागीय अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे ५०० रुपये टँकरच्या दराने दररोज तीन ते चार टँकर पाणी मागवून आदिवासी मुलींना पाण्याची सोय केली जात आहे. सध्या या दोन्ही वसतीगृहात १९० मुली राहत असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. या १९० मुलींकरीता दररोज दोन हजार रुपये खर्चुन पाणी टँकरने मागविण्यात येत आहे. परंतु प्रकल्प कार्यालयाद्वारे पर्यायी व्यवस्थेचा मार्ग काढल्या जात नसल्याचे बघायला मिळत आहे. वसतीगृहासमोर फार मोठी विहीर बांधली आहे, परंतु त्या विहिरीत पाणीच नाही. विशेष म्हणजे आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून सर्व विभागांना कोट्यवधींच्या योजना पुरविल्या जातात. परंतु स्वत:च्या कार्यालयांतर्गत वस्तीगृहाला पाण्याचे नियोजन करण्यात विभाग अपयशी ठरत आहे. (प्रतिनिधी)