शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी पिकांवर पाणी टंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 01:52 IST

यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची झळ बसणार अशा संशय पुर्वीच शेतकऱ्यांना होता.

भूजल पातळी खालावली : पिके सुकण्याच्या मार्गावररावणवाडी : यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची झळ बसणार अशा संशय पुर्वीच शेतकऱ्यांना होता. परंतु फेबु्रवारीच्या शेवटीच विहिरीतील पाण्याची पातळी खालावल्याचे शेतकरी बोलत आहेत. त्यामुळे मे व जून महिन्यात पाणी टंचाईच्या सामना करावा लागणार असल्याचे आताच दिसून येत आहे.यावर्षी अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता त्रस्त झाली होती. जून, जुलै महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पावसाअभावी दुबार-तिबार पेरणी करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. अत्यल्प पावसामुळे शेकडो हेक्टर शेतातील पीके करपून गेली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र फेबु्रवारी महिन्यातच पाण्याची पातळी खालावणार नाही असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र तसे झाले नाही व भूजल पातळी खालावली असे शेतकऱ्यांचे बोलणे आहे. गतवर्षी या महिन्यात विहिरींना मुबलक पाणी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकाचे नियोजन केले. त्यानुसार शेतात भाजीपाला, गहू, टरबूज, काकडी, लवकी आदी पिकांची लागवड केली. मात्र फेबु्रवारीच्या अखेरच पाण्याची पातळी खालावल्याने रब्बी हंगामातही खरीपा प्रमाणे पीक हाती येईल किंवा नाही अशी शंका आता पासूनच शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.खरीप हंगामात धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर आता अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, जवस, लाखोळी आदी पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे येथील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर पर्याय म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे. अशा शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकाची लागवड केली.फेबु्रवारी महिन्याच्या अखेरीस बहुतांश भागातील विहिरीतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आतापासूनच अशी परिस्थिती निर्माण झाली तर मे व जून महिन्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)