शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या प्रतीक्षेत रूग्ण ताटकळत

By admin | Updated: March 27, 2015 00:36 IST

ग्रामीण भागात नागरिकांना वेळेवर उपचारासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने शासनाने रावणवाडी येथे कोट्यवधी रूपयांच्या खर्चातून प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली.

रावणवाडी : ग्रामीण भागात नागरिकांना वेळेवर उपचारासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने शासनाने रावणवाडी येथे कोट्यवधी रूपयांच्या खर्चातून प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली. मात्र या आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध तर होतच नाही. शिवाय रुग्णांना सतत डॉक्टरांचीच प्रतीक्षा करीत जिवंतपणीच मरण यातना सहन कराव्या लागत आहेत.सामान्य जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासन वेळोवेळी प्रयत्नशील असते. परंतु जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव नसणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सामान्य जनतेच्या आरोग्याशी काहीच देणे घेणे नाही. पूर्वीच आरोग्य केंद्रातील पदे रिक्त असल्याने त्यांचा दैनंदिन काम काजावर विपरित परिणाम होत आहे. दोन मंजूर वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी डॉ. शिल्पा शहारे ह्या वरिष्ठांच्या विना परवाणगीने मागील दहा-बारा दिवसांपासून स्वत:च्या मर्जीने रजेवर गेल्याचे आढळून आले आहे. सदर वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी न राहता स्वत:च्या सोयीनुसार नागपूरवरुन अपडाऊन करतात. अशात रुग्णांनी उपचारासाठी कुणाकडे जावे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. आरोग्य केंद्राच्या आवारातच अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता सुसज्ज अशी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. परंतु बहुतांश निवासस्थाने रिकामेच पडून आहेत. वैद्यकीय अधिकारीच अपडाऊन करीत असल्यामुळे कर्मचारीही स्वयंमर्जीनुसार अपडाऊन करतात. अशा कार्यपद्धतीमुळे रुग्णांना हवा असलेले उपचार मिळणे कसे शक्य होणार? याची जाणिवसुद्धा वरिष्ठांना नाही.सध्या संपूर्ण राज्यात स्वाईन फ्ल्यू आजाराची धास्ती पसरली आहे. या आजारांनी मृत्यू होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रत्येक आठवड्यात हवामानात बदल होत आहे. उन्हाळा सुरु झाला असला तरी अवकाळी पावसाच्या कहराने हवामानातही फपाट्याने परिवर्तन होत आहे. यामुळे रुग्णसंख्येत वाढ होणे स्वाभाविक आहे. मात्र आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने आरोग्य केंद्र निराधार झाले आहे. वैद्यकीय अधिकारी आपल्या कर्तव्याची जान नसल्यासारखे कृत्य करीत असल्याने याचा फटका सरळ सर्वसामान्य नागरिकांवर होत आहे. काही कर्मचारी कागद काळे करण्यातच मस्त आहेत. अशात सामान्य नागरिकांनी उपचार करावे तरी कुठे? असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे. या प्रकाराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (वार्ताहर)