तुमसर येथील घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 06:00 AM2020-01-18T06:00:00+5:302020-01-18T06:00:13+5:30

आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जि.प.सदस्य रमेश चुºहे, पंचायत समिती सदस्य मंजू डोंगरवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चरण शहारे, नारायण सावरकर, नंदू डोंगरवार, सदू विठ्ठले, ग्रा.पं.सदस्य अनिता उप्रीकर,अशोक लंजे, ग्रा.पं.सदस्य सचिन लोहिया, राजू वैद्य, लाला मोदी यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी सकाळी ११ वाजता सौंदड येथील चौकात मोर्चाला सुरूवात झाली.

Villagers march in protest of the incident at Tumsar | तुमसर येथील घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांचा मोर्चा

तुमसर येथील घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांचा मोर्चा

Next
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : आरोपींचा शोध घेऊन कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्क
सौंदड : गोरेगाव तालुक्यातील तुमसर येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना सहा दिवसांपूर्वी घडली. या घटनेचा निषेध नोंदवित सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील गावकऱ्यांनी शुक्रवारी (दि.१७) सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली.
आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जि.प.सदस्य रमेश चुºहे, पंचायत समिती सदस्य मंजू डोंगरवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चरण शहारे, नारायण सावरकर, नंदू डोंगरवार, सदू विठ्ठले, ग्रा.पं.सदस्य अनिता उप्रीकर,अशोक लंजे, ग्रा.पं.सदस्य सचिन लोहिया, राजू वैद्य, लाला मोदी यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी सकाळी ११ वाजता सौंदड येथील चौकात मोर्चाला सुरूवात झाली.
या मोर्चात सौंदड येथील गावकरी मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी दिलेल्या निवेदनातून गोरेगाव तालुक्यातील तुमसर येथे सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याची काही असामाजिक तत्वांनी विटंबना केली. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच अशा प्रकाराचा घटनांना पायबंद लागवा यासाठी उपाय योजना करण्याची मागणी करण्यात आली. सौंदड येथील गावकरी या घटनेचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त करीत असल्याचे म्हटले आहे.
 
Web Title: Villagers march in protest of the incident at Tumsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा