शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

पीयूसीविना धावताहेत वाहने

By admin | Updated: December 24, 2015 02:25 IST

वाढत्या नागरिकरणाने रहदारीची समस्या बळावली आहे. त्यात दिवसेंगणिक वाहनांच्या संख्येने भर घातली

४.१८ लाखांचा दंड वसूल : ठोस उपाययोजनाच नाहीतइंद्रपाल कटकवार भंडारावाढत्या नागरिकरणाने रहदारीची समस्या बळावली आहे. त्यात दिवसेंगणिक वाहनांच्या संख्येने भर घातली असताना प्रदुषणाच्या स्तरातही वाढ होत आहे. जिल्ह्यात दोन लाखांच्या घरात वाहनांची संख्या असली तरी वाहन वायु प्रदुषणमुक्त करण्याच्या (पीयुसी) नियमांना नागरिकांनीच ‘खो’ दिला आहे. विशेष म्हणजे एकूण वाहनांपैकी किती वाहनधारकांनी नियमितपणे ‘पीयुसी’ केली आहे, याची रितसर नोंद आरटीओमध्ये नाही. आपण चालवित असलेल्या वाहनाद्वारे प्रदूषण होत आहे किंवा नाही हे ठरविण्याचे मानक शासनाने जारी केले असले तरी आजही भंडारा जिल्ह्यातील हजारो वाहनधारक ‘पीयुसी’ प्रमाणपत्राविनाच वाहन चालवित आहेत. यासाठी वाहनचालकांच्या मानसिकतेत बदल घडून येणे महत्त्वाचे आहे. आधीच प्रदुषणामुळे मानवी आरोग्याला फटका बसत असताना दुसरीकडे वाहनचालकांकडून नियमांना तिलांजली देण्याचा प्रकार सुरू आहे. ४.१८ लाखांचा दंड वसूलपीयुसी काढल्यानंतर सोबत न बाळगणे अथवा पीयुसी न काढणे या दोन बाबींच्या अनुषंगाने भंडारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने वर्षभरात २,७२० वाहनधारकांची तपासणी केली. यापैकी २५४ वाहनधारकांनी पीयुसी काढली परंतु सोबत बाळगली नसल्याने त्यांच्याकडून १०,६२० हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. याशिवाय पीयुसी नसलेल्या ४१७ वाहनधारकांकडून ३ लाख ९८ हजार ५०० रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.वाहनसंख्या पाऊणेदोन लाखावर भंडारा जिल्ह्यात एक लक्ष ८२ हजार २८९ वाहनांची नोंद आहे. जिल्ह्यात एकूण १,२१९ आॅटोरिक्षा आहेत. मोटारसायकल १ लाख ५,१००, स्कूटर २६,४८६, मोपेड २०,६७१, मोटारकार ७,६८९, जिप ७,६८९, स्कूल बसेस १५० ट्रक व लॉरी १,११३, टँकर्स ६७, मालवाहतूक चारचाकी गाडी १,७१७, तीन चाकी मालवाहतूक गाडी ५७१, ट्रॅक्टर ८,८३९ आहेत.अद्याप ठोस कारवाई नाही!केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांना पुढे पाठविण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होत असते. प्रदूषण नियंत्रणासाठी कोणताही उपक्रम नाही. विशेष म्हणजे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून तपासणी व दंड आकरणी केल्याशिवाय कुठलीच ठोस कारवाई होत नाही. काय म्हणतो ‘पीयुसी’ कायदाकेंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ११५ व ११६ नुसार मोटार वाहनांकरिता पेट्रोल ंिधनावर चालणाऱ्या वा डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनाकरिता वायु प्रदुषण प्रमाणपत्र हे बंधनकारक आहे. याकरिता वाहनातून उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषक घटकाचे प्रमाण कायद्याने निश्चित केले आहे. त्यामुळे वाहन चालकांनी आपल्या वाहन धूर सोडणारे आहे का? याची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. वाहन रस्यावर चालविण्यापूर्वी प्रदूषण नियंत्रित मर्यादेत असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याकरिता प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र जारी करण्याऱ्या खाजगी केंद्रांना मोटार वाहन विभागाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार त्या-त्या ठिकाणी वाहनांच्या प्रदुषणाची तपासणी करून ‘पीयूसी’ प्रमाणपत्र देण्याची तरतुद आहे.नवीन वाहनांकरिता वाहनाचे नोंदणीनंतर एक वर्ष वायु प्रदुषण प्रमाणपत्र आवश्यक नाही. मात्र त्यानुसार निकषानुसार वाहनांची पीयुसी काढणे महत्वाचे आहे. एखाद्या वाहनधारकाकडे पीयुसी नसेल तर १००० रूपये व असेल पण सोबत बाळगला नसेल तर १०० रूपये दंड आकारला जातो. मोटार वाहनांद्वारे होणाऱ्या वायु प्रदुषणाबाबतच्या तरतुदी मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १९० तसेच केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ११५ व ११६ मध्ये समाविष्ट आहेत.