शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाचे कामकाज नवख्यांच्या हाती

By admin | Updated: July 6, 2014 23:59 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या मेंदूज्वर लसीकरण मोहेम राबविली जात आहे. १ ते १५ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांसाठी असलेल्या लसीकरणाचे कामकाज मात्र नवख्यांच्या हाती दिसून आले.

माहितीअभावी पालकांची धावपळ : उघड्यावरच सुरू होते लसीकरण
गोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या मेंदूज्वर लसीकरण मोहेम राबविली जात आहे. १ ते १५ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांसाठी असलेल्या लसीकरणाचे कामकाज मात्र नवख्यांच्या हाती दिसून आले. शहरातील धोटे सूतिकागृहात तर उघड्यावरच लसीकरण केले जात होते. शिवाय प्रचार व प्रसिद्धीअभावी पालकांची धावपळसुद्धा दिसून आली.
मेंदूज्वर हा गंभीर आजार आहे. यापासून चिमुकल्यांची सुरक्षा व्हावी या दृष्टीने सध्या लसीकरणाची विशेष मोहीम राबविली जात आहे. यांतर्गत शाळांत जाऊन विद्यार्थ्यांना लसीकरण केले जात आहे. याशिवाय कधीपासून तर कधीपर्यंत, कोठे, कालावधी याबाबत जनतेला माहितीच नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या लसीकरणाची व्यापक प्रचार व प्रसिद्धीच करण्यात आली नसल्याचे दिसते. शिवाय सदर प्रतिनिधीने शनिवारी शहरातील धोटे सूतिकागृहात जाऊन पाहिले असता तेथे अंगणात उघड्यावरच लसीकरणाचे काम सुरू असल्याचे दिसले. यात दोन मुली लसीकरणासाठी आलेल्यांचे कार्ड भरत होत्या. त्यातही त्यांना धड नावसुद्धा लिहिता येत नसल्याचे दिसले. तर लस लावण्यात येणाऱ्या चिमुकल्यांची पूर्ण माहितीसुद्धा त्यांनी विचारून भरली नसल्याचे आढळले. फक्त आई-वडिलांचे नाव व पत्ता लिहून कार्ड भरले जात होते. शिवाय लस लावणारी एक मुलगी व एक महिला दिसून आली. त्यांनाही पटापट लस लावून आपले काम आटोपण्याची घाई दिसून आली. त्यांना विचारणा केली असता, शनिवार हा शेवटचा दिवस असल्याचे कळले.
मेंदुज्वरसारख्या जीवघेण्या आजारावरील लसीकरणाचा कार्यक्रम असताना एखादे होर्डिंग किंवा पत्रक दिसून न आल्याने लसीकरणाची मोहीम ज्या लोकांना माहिती पडली फक्त तेवढ्यांपुरतीच होती असा भास होतो. शाळेत जाऊन लसीकरण केले जात असल्याचे ऐकायला आले. मात्र जी मुले शाळेत जात नाहीत त्यांचे काय, असा सवाल मात्र आता नागरिक करीत आहेत.
शिवाय एवढा मोठा व महत्त्वपूर्ण कार्यक्रम शासन राबवीत असला तरी जिल्हा आरोग्य विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे सर्वसामान्य जनता मात्र त्यापासून वंचित राहणार असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. याकडे मात्र लोकप्रतिनिधी व नागरिकांंचेही दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. (शहर प्रतिनिधी)