शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

लोकोपयोगी ६५ मॉडेल्स सादर

By admin | Updated: December 20, 2015 01:55 IST

पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने एमआय पटेल हायस्कूल सोनी येथे दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन : ग्रामीण विद्यार्थ्यांची प्रतिभागोरेगाव : पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने एमआय पटेल हायस्कूल सोनी येथे दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्याचा समारोप मंगळवारी करण्यात आला. या प्रदर्शनीत तालुक्यातील ६५ विज्ञानाचे नमुने (मॉडेल) ठेवण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन जि.प. सभापती (शिक्षण व आरोग्य) पी.जी. कटरे यांच्या अध्यक्षतेत आ.विजय रहांगडाले यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.हरिहरभाई पटेल, माजी जि.प. अध्यक्ष के.आर.शेंडे, गटशिक्षणाधिकारी वाय.पी.कावळे, गटसमन्वयक टी.बी. भेंडारकर, प्राचार्य व्ही.टी. पटले उपस्थित होते. याप्रसंगी आ. विजय रहांगडाले यांनी विज्ञान प्रदर्शनीतून सध्याच्या जीवंत समस्यांवर उपयोगी व लोकोपयोगी प्रयोग सादर केले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. पी.जी.कटरे यांनी आजच्या काळात विज्ञानाचे योगदान अतिशय महत्वाचे असल्याचे मत विषद केले. प्रदर्शनीचे परीक्षण जगत महाविद्यालय गोरेगावचे प्रा.बी.बी.परशुरामकर, प्रा. एस. टी. नंदेश्वर, शहिद जान्या तिम्या जि.प.हायस्कूल गोरेगावचे प्राचार्य आकरे यांनी केले. प्रदर्शनीत क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांना पं.स. सभापती दिलीप चौधरी यांच्या अध्यक्षतेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल शेंडे, पं.स.सदस्या राणी रहांगडाले, सरपंच उषा वलथरे, तंमुस अध्यक्ष चंद्रकला पटले व पोलीस पाटील आशा बोपचे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्राथमिक गटातून एमआय पटेल हायस्कूल सोनी येथील कुणाल डिलीराम पटले प्रथम, मॉडेल कॉन्व्हेंट गोरेगाव येथील सादगी रामप्रकाश चौधरी द्वितीय तर जि.प. शाळा बाम्हणी येथील गौरी वामेश्वर कटरे हिने तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक गटातून एमआय पटेल हायस्कूल सोनी येथील दिक्षा अशोक भगत, किरसान मिशन गोरेगाव येथील प्रलय मधुकर बागडे व शहिद जान्या तिम्या जि.प. हायस्कूल गोरेगाव येथील मोहीत भोजराज दमाहे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले. यशस्वीतेकरिता गटसाधन केंद्र गोरेगाव येथील विषयतज्ञ बी. बी. बहेकार, एस.बी.ठाकुर, एस. टी. बावनकर, जी.जी.ठाकरे, ओ. एस. ठाकरे, एस.डी.रहांगडाले, एमआय पटेल हायस्कूल सोनी येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. संचालन एस.एस.शहारे व आभार कावळे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)