शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

युरियाने वाढविली शेतकऱ्यांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:00 IST

जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र असून यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. पण यंदा जून महिन्यात पाऊस लांबल्याने रोवणीची कामे लांबणीवर गेली होती. परिणामी रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. रोवणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रोवणीला सुरूवात केली आहे.

ठळक मुद्दे१४ हजार मेट्रिक टन खताची मागणी : रोवणीसाठी युरियाची गरज, कृषी विभाग म्हणतो आठ दिवसात येणार युरिया

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला थोडा वेग आला आहे. रोवणीकरिता शेतकऱ्यांची युरियाची खताची सर्वाधिक मागणी असते. मात्र यंदा मागणीपेक्षा युरिया खताचा पुरवठा कमी झाल्याने खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे.जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र असून यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. पण यंदा जून महिन्यात पाऊस लांबल्याने रोवणीची कामे लांबणीवर गेली होती. परिणामी रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. रोवणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रोवणीला सुरूवात केली आहे. शेतकऱ्यांना रोवणीसाठी सध्या युरिया खताची सर्वाधिक गरज आहे. मात्र बाजारपेठेत युरिया खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.युरिया खताची अद्यापही रॅक लागली नसल्याने कृषी केंद्रांना सुध्दा युरियाचा पुरवठा झालेला नाही. ज्या कृषी केंद्राकडे थोड्या फार प्रमाणात युरियाचा साठा आहे, ते शेतकऱ्यांची गरज लक्षात घेत अतिरिक्त दराने विक्री करीत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. सध्या बाध्यांमध्ये पाणी साचले असल्याने रोवणी लवकरात लवकर आटोपण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. मात्र दुसरीकडे रोवणीसाठी युरिया मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. जिल्हा कृषी विभागाने यंदा एकूण १४ हजार ४०५ मेट्रीक टन युरियाची मागणी केली होती. त्यापैकी आत्तापर्यंत ९ हजार ७४३ मेट्रीक टन युरियाचा पुरवठा झाला आहे.शेतकऱ्यांची खताची मागणी लक्षात घेता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने पुणे येथील आयुक्त कार्यालय आणि खत पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे युरिया खताची मागणी केली आहे. येत्या सात आठ दिवसात युरिया खताची रॅक लागण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.कृषी केंद्रांवर पथकाची नजरजिल्ह्यात युरिया खताची निर्माण झालेली टंचाई लक्षात घेता काही कृषी केंद्र संचालक अतिरिक्त दराने खताची विक्री करीत असल्याची ओरड वाढली आहे. याच पार्श्वभुमीवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने धडक मोहीम सुरू केली आहे. अतिरिक्त दराने युरियाची विक्री करणाºया कृषी केंद्रावर नजर ठेवली असल्याची माहिती आहे.जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे युरिया खताची मागणी वाढली आहे. मागणी लक्षात घेता युरियाची मागणी केली असून येत्या सात आठ दिवसात युरियाची रॅक लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करु नये.- गणेश घोरपडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

टॅग्स :Farmerशेतकरी