युरियाने वाढविली शेतकऱ्यांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:00 AM2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:00:30+5:30

जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र असून यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. पण यंदा जून महिन्यात पाऊस लांबल्याने रोवणीची कामे लांबणीवर गेली होती. परिणामी रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. रोवणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रोवणीला सुरूवात केली आहे.

Urea raises farmers' concerns | युरियाने वाढविली शेतकऱ्यांची चिंता

युरियाने वाढविली शेतकऱ्यांची चिंता

Next
ठळक मुद्दे१४ हजार मेट्रिक टन खताची मागणी : रोवणीसाठी युरियाची गरज, कृषी विभाग म्हणतो आठ दिवसात येणार युरिया

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला थोडा वेग आला आहे. रोवणीकरिता शेतकऱ्यांची युरियाची खताची सर्वाधिक मागणी असते. मात्र यंदा मागणीपेक्षा युरिया खताचा पुरवठा कमी झाल्याने खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र असून यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. पण यंदा जून महिन्यात पाऊस लांबल्याने रोवणीची कामे लांबणीवर गेली होती. परिणामी रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. रोवणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रोवणीला सुरूवात केली आहे. शेतकऱ्यांना रोवणीसाठी सध्या युरिया खताची सर्वाधिक गरज आहे. मात्र बाजारपेठेत युरिया खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
युरिया खताची अद्यापही रॅक लागली नसल्याने कृषी केंद्रांना सुध्दा युरियाचा पुरवठा झालेला नाही. ज्या कृषी केंद्राकडे थोड्या फार प्रमाणात युरियाचा साठा आहे, ते शेतकऱ्यांची गरज लक्षात घेत अतिरिक्त दराने विक्री करीत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. सध्या बाध्यांमध्ये पाणी साचले असल्याने रोवणी लवकरात लवकर आटोपण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. मात्र दुसरीकडे रोवणीसाठी युरिया मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. जिल्हा कृषी विभागाने यंदा एकूण १४ हजार ४०५ मेट्रीक टन युरियाची मागणी केली होती. त्यापैकी आत्तापर्यंत ९ हजार ७४३ मेट्रीक टन युरियाचा पुरवठा झाला आहे.
शेतकऱ्यांची खताची मागणी लक्षात घेता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने पुणे येथील आयुक्त कार्यालय आणि खत पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे युरिया खताची मागणी केली आहे. येत्या सात आठ दिवसात युरिया खताची रॅक लागण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

कृषी केंद्रांवर पथकाची नजर
जिल्ह्यात युरिया खताची निर्माण झालेली टंचाई लक्षात घेता काही कृषी केंद्र संचालक अतिरिक्त दराने खताची विक्री करीत असल्याची ओरड वाढली आहे. याच पार्श्वभुमीवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने धडक मोहीम सुरू केली आहे. अतिरिक्त दराने युरियाची विक्री करणाºया कृषी केंद्रावर नजर ठेवली असल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे युरिया खताची मागणी वाढली आहे. मागणी लक्षात घेता युरियाची मागणी केली असून येत्या सात आठ दिवसात युरियाची रॅक लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करु नये.
- गणेश घोरपडे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

Web Title: Urea raises farmers' concerns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी