शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

अघोषित भारनियमनाने जिल्हावासी त्रस्त

By admin | Updated: February 12, 2015 01:21 IST

राज्यात सतत होणारे भारनियम मुक्त करून शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून शेतीमालाला योग्य भाव देण्याचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या ...

गोंदिया : राज्यात सतत होणारे भारनियम मुक्त करून शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून शेतीमालाला योग्य भाव देण्याचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या शासनाने मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले. त्यातही महावितरणकडून अघोषित भारनियमन सतत होत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिके लावली आहेत त्यांनाही मोठा फटका या भारनियमनाचा बसत आहे.भारनियमनमुक्त राज्याची घोषणाच आता फुसका बार ठरत असल्याचे जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे या मुख्य समस्येला घेऊन एकाही पक्षाने आवाज उचलला नसून उन्हाळ्याची चाहूल काही काळानंतर सुरू होणार असल्याने आतापासूनच महावितरणने भारनियमन करण्याला सुरूवात केली काय, असा सवालही आता उपस्थित झाला आहे. मागील काही महिन्यांपासून शहरातील भारनियमनात कपात करण्यात आली होती. तर ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सहा तास खंडित करण्यात येत होता. पण आता ५-६ दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात अघोषित भारनियमन करण्यात येत असल्याने नागरिकांची चांगलीच कोंडी होत आहे. खरीपातील पिकांची मळणी आटोपल्यानंतर शेतकरी रबी हंगामाच्या पीक लागवडीकडे वळला आहे. त्यासाठी हजारो शेतकरी कृषी पंपाचा वापर करीत आहेत. मात्र भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)