कारची पुलाला धडक दोन ठार, दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST2020-01-08T06:00:00+5:302020-01-08T06:00:21+5:30
हरिहरनगर नागपूर येथील चतुर्वेदी परिवार राजनांदगावरुन नातेवाईकांना भेटून मंगळवारी नागपूरला परत येत होते. दरम्यान देवरीपासून ४ कि.मी. अंतरावर असलेल्या मासुलकसा गावाजवळ रस्त्यावरील पुलाला कारची धडक होऊन कार खाली पाण्यात कोसळली. या अपघातात भारती रामसेवक चतुर्वेदी (६५) व निता महेश चतुर्वेदी यांचा जागीच मृत्यू झाला.

कारची पुलाला धडक दोन ठार, दोन गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : तालुक्यातील मासुलकसा गावाजवळील पुलाला कारने धडक दिल्याने दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.७) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. मृतकांमध्ये सासू सुनेचा समावेश आहे.
भारती रामसेवक चतुर्वेदी (६५) व निता महेश चतुर्वेदी रा.हरिहरनगर नागपूर अशी अपघात ठार झालेल्या सासू सुनेची नाव आहे. तर पलक महेश चतुर्वेदी (१३) व महेश रामसेवक चतुर्वेदी (४७) असे अपघातात गंभीर जखमी असलेल्यांची नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार हरिहरनगर नागपूर येथील चतुर्वेदी परिवार राजनांदगावरुन नातेवाईकांना भेटून मंगळवारी नागपूरला परत येत होते. दरम्यान देवरीपासून ४ कि.मी. अंतरावर असलेल्या मासुलकसा गावाजवळ रस्त्यावरील पुलाला कारची धडक होऊन कार खाली पाण्यात कोसळली. या अपघातात भारती रामसेवक चतुर्वेदी (६५) व निता महेश चतुर्वेदी यांचा जागीच मृत्यू झाला.
पलक महेश चतुर्वेदी (१३) व महेश रामसेवक चतुर्वेदी (४७) हे गंभीर जखमी झाले. त्यांना देवरी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी देवरी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.