शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

अपघात विम्याचे दोन दावे ग्राहक न्यायालयात वैध

By admin | Updated: December 1, 2014 22:56 IST

दोन शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या घटनेत अपघाती मृत्यू होवून पाच वर्षांचा कालावधी लोटला तरी विम्याचे दावे मंजूर किंवा नामंजूर असे काहीही न कळविणाऱ्या दि ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीला ग्राहक

गोंदिया : दोन शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या घटनेत अपघाती मृत्यू होवून पाच वर्षांचा कालावधी लोटला तरी विम्याचे दावे मंजूर किंवा नामंजूर असे काहीही न कळविणाऱ्या दि ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीला ग्राहक न्यायमंचाने चांगलेच धारेवर धरले. हे दावे मंजूर करीत शेतकऱ्यांना वारसांना विम्याची रक्कम देण्याचा देण्याचा ओरिएंटल इन्शुरन्सला दिला.
मनिषा प्रशांत मिश्रा रा.सावरा ता.तिरोडा असे तक्रारकर्त्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती प्रशांत उर्फ अभय राधेश्याम मिश्रा यांचा शेतात विद्युत पंपाने पाणी देताना करंट लागून अपघाती मृत्यू झाला. याला पाच वर्षे लोटले. तर दुसऱ्या प्रकरणात तक्रारकर्ती यमुना प्यारेलाल लिल्हारे रा. पिपरिया ता. तिरोडा यांचे पती प्यारेलाल यांचा दुचाकी अपघाती मृत्यू झाला. मात्र सर्व कागदपत्रे सादर केल्यावरही सदर विमा कंपनीने दाव्यांच्या मंजुरी-नामंजुरीबाबत कळविले नाही. त्यामुळे त्यांनी विमा रक्कम मिळविण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे धाव घेतली.
ग्राहक न्यायमंचाने दि ओरिएंटल विमा कंपनीला नोटीस बजावल्यानंतर विमा कंपनीने आपल्या लेखी जबाबात मृतक शेतकरी असल्याच्या माहितीअभावी विमा दाव्यास पात्र नाही. तसेच मनिषा मिश्रा यांनी सादर केलेला दावा प्रस्ताव विमा कंपनीस मिळालाच नसल्याचे सांगितले. दुसऱ्या प्रकरणातही विमा दावा मिळण्याबाबतचा प्रस्ताव विमा कंपनीला मिळाला नसून सदर दावा मुदतीबाहेर आहे, असा जबाब विमा कंपनीच्या वतीने देण्यात आला.
यावर तक्रारकर्त्यांचे वकील अ‍ॅड.उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, २९ जून २००८ रोजी शेतात पाणी देत असताना शेतकरी प्रशांत मिश्रा यांचा मृत्यू झाला. प्रकरणात सात-बाराचा उतारा व फेरफार नकल जोडली असून मृतकाची पत्नी मनिषा अपघात विम्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी या व्याख्येत मोडते. शिवाय विमा कंपनीने दावा दाखल केल्यावरही मंजूर-नामंजूर न कळविल्याने सदर दावा मुदतीत आहे. तसेच शासन निर्णयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सदर लाभासाठी विमा कंपनीकडे स्वतंत्रपणे अर्ज/कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही, अशी भूमिका मांडली. दुसऱ्या प्रकरणात तक्रारकर्ती यमुना लिल्हारे यांनी सदर विमा कंपनीकडे ४ एप्रिल २००९ रोजीच प्रस्ताव सादर केला होता. त्यात काही त्रुटी असल्याने त्यांनी तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे सदर त्रुटी पूर्ण करून ३० जून २००९ रोजी प्रस्ताव परत पाठविला. शासन निर्णयानुसार, ज्या दिवशी प्रस्ताव सादर केला त्याच दिवशी तो प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर झाला, असे त्यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले.
यानंतर दोन्ही प्र्रकरणांची ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने कारणमिमांसा करून दोन्ही तक्रारी अंशत: मंजूर केल्या. दोन्ही प्रकरणांतील शेतकरी पत्नी मनिषा प्रशांत मिश्रा व यमुना प्यारेलाल लिल्हारे यांना मृतक पतींच्या अपघात विम्याचे प्रत्येकी एक-एक लाख रूपये दरसाल दरशेकडा ९ टक्के व्याजदराने द्यावे, तसेच आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून दोघींना प्रत्येकी १० -१० हजार रूपये व तक्रारीचा खर्च म्हणून दोघींना प्रत्येकी पाच-पाच हजार रूपये आदेशाची प्रत मिळाल्याच्या ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश दिला. (प्रतिनिधी)