शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी राहण्याच्या आदेशाचे वाजले बारा

By admin | Updated: October 28, 2014 23:00 IST

महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्यांना आपला मुख्यालयी राहणे बंधनकारक केले असतानादेखील परिसरातील कर्मचारी, अधिकारी मुख्यालयात राहात नसल्याची ओरड दिवसेंदिवस ग्रामीण व शहरी

परसवाडा : महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्यांना आपला मुख्यालयी राहणे बंधनकारक केले असतानादेखील परिसरातील कर्मचारी, अधिकारी मुख्यालयात राहात नसल्याची ओरड दिवसेंदिवस ग्रामीण व शहरी कार्यालयात वाढत आहे. या मुख्यालयात न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करून त्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी अशी मागणी ग्रामीण जनतेने केली आहे. तिरोडा तालुक्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना आपल्या मुख्यालयी राहणे बंधनकारक केले असताना ग्रामीण भागातील शिक्षक, डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, बँक कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, विद्युत कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी शासनाच्या आदेशाचे तीन-तेरा वाजवून आदेशाला न जुमानता तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या व उपराजधानीच्या ठिकाणावरून ये-जा करतात. हे सर्व शासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता स्थानिक नागरिकांकडून उलट सांगून मुख्यालयात असल्याचे दाखले घेऊन मुख्यालयी असल्याचे भासवत आहेत. सरपंचांना हाती धरून मुख्यालयी राहात असल्याचे दाखले कर्मचाऱ्यांना दिले जातात. त्यामुळे ते घरभाड्याची उचल करतात. कर्मचारी ही बनवाबनवी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या डोळ्यासमोर करीत असूनदेखील प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी या कर्मचाऱ्यांची पाठ राखण करीत आहेत. शासन ग्रामीण भागातील जनतेच्या विकास होण्याच्या उद्देशाने ग्रामसेवक, तलाठी व शिक्षक, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, कृषी सहायक, केंद्रप्रमुख, विद्युत कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहात असतील तर गावाचा विकास झपाट्याने होतो. शासकीय सेवेमध्ये रुजू होताना मुख्यालयी राहण्याकरिता शासकीय कर्मचाऱ्यांना सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. तिरोडा तालुका नक्षलग्रस्त असल्याचा फायदासुध्दा हे कर्मचारी घेत आहेत. शिक्षणाच्या वाटा मोकळ्या करून दिल्या. ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिक्षण घेणे सोपे व्हावे याकरिता शासनाने अनेक उपक्रम सुरू केले. पण ग्रामीण भागातील शिक्षकच मुख्यालयी राहत नसल्याने विद्यार्थ्यांवर वचक बसत नाही. शाळेतील पालक-शिक्षक संघ आणि इतर समित्या फक्त कागदावर असून याकडे कोणतेच प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी लक्ष देण्यास तयार नाही. कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा वचक नसल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनमर्जीने कामकाज सुरू आहे. शासकीय कर्मचारी जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहून स्वत:च्या मुलांना शहरातील शाळांमध्ये शिक्षण देतात. शहरी भागात राहून शासकीय कर्मचारी मोटारसायकलने ये-जा करतात. मुख्यालयी न राहता कित्येकदा हे कर्मचारी केव्हा येतात आणि कधी निघून जातात, हे कळायला मार्गच नाही. ग्रामीण भागात ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, कृषी सहायक, विद्युत कर्मचारी राहात नसल्यामुळे जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. शासनाचे करोडो रुपये, घर भाडे फुकट कर्मचारी घेत आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)