शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

साखरीटोल्यातील भारनियमन बंद करा

By admin | Updated: May 29, 2014 02:32 IST

सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथे सुरू असलेले विजेचे भारनियमन त्वरीत बंद करण्यात यावे, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे.

साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथे सुरू असलेले विजेचे भारनियमन त्वरीत बंद करण्यात यावे, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे.

ऐन उन्हाळ्याच्या दिवसात विद्युत विभागाने साखरीटोला फिडरला भारनियमनाचा तडाखा दिल्याने लोकांना उष्णतेचे चटके सहन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये विद्युत विभागाविषयी रोष निर्माण झाला आहे. नागरिकांच्या संतापाचा बांध केव्हाही फुटून ते रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

साखरीटोला येथे विद्युत पुरवठा सतत व्हावा यासाठी येथील काही सुज्ञ मंडळीनी प्रयत्न करून ३३ केव्ही पॉवरचे पॉवर हाऊस तयार करण्यात मोठा हातभार लावला होता. तीन फिडरपैकी साखरीटोला फिडरला भारनियमन देण्यात येते. त्यामुळे आग ओकणार्‍या सुर्याच्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. भरदिवसा दुपारी २.३0 वाजता ते ५.३0 वाजतापर्यंत कडक उष्णतेच्या वेळी भारनियमन असते. त्यामुळे नागरिक, व्यापारी, दुकानदार चांगलेच संतापलेले आहेत.

भारनियमामुळे व्यापारी, दुकानदार, राईस मिल मालक तसेच छोटे-छोटे व्यवसाय करणार्‍या लोकांना चांगलाच फटका बसला असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सालेकसा तालुका नक्षलग्रस्त व आदिवासी म्हणून परिचीत असतांना तालुक्यातील गावांमध्ये भारनियमन कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील बर्‍याच दिवसापासून ऐन उन्हाळ्याच्या दिवसात विद्युत विभागान साखरीटोला,कारूटोला, बापूटोला तसेच आजूबाजूच्या गावात भारनियमन सुरू असले तरी या समस्येकडे मात्र लोकप्रतिनिधीच पूर्णपणे दुर्लक्ष आहेत. विद्यमान आमदार सुध्दा ही समस्या सोडविण्यासाठी गंभीर नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये चांगलाच रोष आहे.

विद्युत विभागाच खाजगीकरण झाल्यानंतर ग्राहक नियमित बिलाचा भरणा करतात. एक किंवा दोन महिने बील न भरल्यास विद्युतचे कनेक्शन कापले जाते. मग जे लोक नियमित बिलाचा भरणा करतात. त्यांना भारनियमनाचा तडाखा का दिला जातो असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विद्युतचे भारनियमन त्वरीत बंद करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी तंमुसचे अध्यक्ष प्रकाश दोनोडे, सरपंच संतोष शहारे, गांधीटोल्याच्या सरपंच रेखा टेकचंद फुंडे, कारूटोल्याचे सरपंच मिलिंद गजभिये, अरविंद गजभिये, संजय कुसराम, पृथ्वीराज शिवणकर यांनी विद्युत विभागाकडे केली आहे. भारनियमन बंद न झाल्यास रस्त्यावर उतरण्याची तयारी नागरिकांनी दाखविली आहे. नक्षलग्रस्त भागात भारनियमन होणार नाही असे शासन सांगत असले तरी सर्रासपणे भारनियमन होत आहे. (वार्ताहर)