शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

स्मृतीदिनी शहिदांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 5:00 AM

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे व पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. तसेच उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही गुलाबाचे फुल व पुष्प अर्पण केले. याप्रसंगी तांबडे यांनी, ज्यांनी वेळोवेळी कर्तव्य पथावर अग्रेसर असताना लोकतंत्र रक्षणार्थ आपल्या जिवाची पर्वा न करता ‘आपला आज’ देशवासीयांच्या उद्यासाठी स्वत:चे प्राण अर्पण केलेला आहे.

ठळक मुद्देपोलीस मुख्यालयात कार्यक्रम : परेड व फायर करून दिली शहिदांना सलामी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पोलीस स्मृती दिनानिमित्त कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना सोमवारी (दि.२१) पोलीस मुख्यालयात सलामी देऊन श्रद्धांंजली अर्पण करण्यात आली.प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे व पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. तसेच उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही गुलाबाचे फुल व पुष्प अर्पण केले. याप्रसंगी तांबडे यांनी, ज्यांनी वेळोवेळी कर्तव्य पथावर अग्रेसर असताना लोकतंत्र रक्षणार्थ आपल्या जिवाची पर्वा न करता ‘आपला आज’ देशवासीयांच्या उद्यासाठी स्वत:चे प्राण अर्पण केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून २१ ऑक्टोबर हा दरवर्षी देशभर पोलीस स्मृतीदिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे सांगीतले.२१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्त्वाचा आहे. या वर्षी देखील संपूर्ण भारतामध्ये आपले कर्तव्य बजावित असतांना शहिद झालेल्या एकूण २९२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे व महिला पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी वाचली. राखीव पोलीस निरीक्षक कमलाकर घोटेकर यांनी शहीद पोलीस स्मृतीदिन सलामीचे नेतृत्व करुन शोक सलामी दिली. सलामी परेड मधील पोलीस कर्मचाऱ्यांकडून हवेत प्रत्येकी तीन राऊंड फायर करण्यात आले. संचालन सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप अतुलकर यांनी केले. कार्यक्रमासाठी पोहवा सेवक राऊत, नापोशि राज वैद्य तसेच पोलीस मुख्यालय येथील डी.आय.स्टॉफने सहकार्य केले. याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक (गृह) सोनाली कदम यांच्यासह मोठ्या संख्येत पोलीस अधिकारी-कर्मचारी व शहिदांचे कुटूंबीय उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक