शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा प्रकल्पाने होणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

खत व ग्रस निर्मिती होणार असून सोबतच प्रकल्पासाठी लागणाऱ्या मनुष्यबळामुळे रोजगार निर्मिती होणार आहे. आजघडीला नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. परिणामी शहरात निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. यामुळे काही का होईना शहरातील वातावरण दूषित होत आहे.

ठळक मुद्देखत, रोजगार व गॅस निर्मिती : घनकचरा व्यवस्थापनाची समस्या सुटणार

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात निघणाऱ्या घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी नगर परिषदेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासाठी नगर परिषदेकडून जागेचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, हा प्रकल्प उभा झाल्यास शहर व गावांतील घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाची समस्या सुटणार आहे. शिवाय प्रकल्पामुळे खत व ग्रस निर्मिती होणार असून सोबतच प्रकल्पासाठी लागणाऱ्या मनुष्यबळामुळे रोजगार निर्मिती होणार आहे.आजघडीला नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. परिणामी शहरात निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. यामुळे काही का होईना शहरातील वातावरण दूषित होत आहे. याचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावरही होत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.सध्या केंद्र शासनाकडून स्वच्छतेवर जास्त भर दिला जात आहे. वातावरण स्वच्छ असल्यास स्वस्थ आरोग्य लाभते यामुळे शहरीच काय ग्रामीण भागातही स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. यासाठीच नगर परिषदेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याची गरज आहे.त्यासाठी त्यांचा जागेसाठी शोध सुरू आहे. नगर परिषदेचा हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा झाल्यास शहरातील घनकचºयाची समस्या सुटणार असतानाच संबंधीत गावांतीलही घनकचºयाचे व्यवस्थापन होणार आहे. याचा फायदा त्या-त्या गावांनाही मिळणार आहे. याशिवाय, या प्रकल्पात कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून खत व गॅस निर्मिती केली जाणार आहे.प्रकल्प असलेल्या गावकऱ्यांना प्रकल्पातून खत मिळणार. शिवाय, वाहन व घरांत स्वयंपाकासाठी गॅस मिळणार. महत्त्वाची बाब म्हणजे, या घनकचरा प्रकल्पात मनुष्यबळ लागणार असून रोजगार निर्मिती होणार आहे. काही लोकांच्या हाताला काम मिळणार आहे.एकंदरीत हा प्रकल्प घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठीच फायदेशीर नसून त्यापासून अन्य फायदे मिळणार आहेत.कारंजा ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा आजनगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जवळील ग्राम कारंजा येथील जागा बघितली आहे. ही जागा नगर परिषदेला द्यायची की नाही हे ठरविण्यासाठी मंगळवारी (दि.४) विशेष ग्रामसभा बोलाविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे गावातील वातावरण गावातील नागरिकांच्या आरोग्यावर काहीच परिणाम होणार नाही. उलट गावातील कचºयाचेही व्यवस्थापन करता येणार असून गावातील वातावरण अधिक शुद्ध होणार आहे. त्यामुळे आता कारंजा ग्रामपंचायतने ठराव दिल्यास गोंदिया शहरासह कारंजा गावातील कचºयाची समस्या सुटून सोबतच त्यांना खत, गॅस व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.अत्यंत लाभदायी ठरणारा प्रकल्पघनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे कचऱ्याची समस्या सुटणार असतानाच गावकऱ्याना खत, गॅस व रोजगार उपलब्ध होणार आहे. गावातील कचऱ्याची समस्या सुटून तेथील वातावरण दूषित होणार नाही.त्यामुळे प्रकल्पासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.- अशोक इंगळे, नगराध्यक्ष, नगर परिषद, गोंदियागावचाही बहुमुखी विकास होणारया प्रकल्पामुळे संबंधीत गावातील घनकचरा व्यवस्थापनाची समस्या सुटेल. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावाला चांगली कामगिरी करता येईल. शिवाय, गावातील लोकांना रोजगार मिळणार असतानाच खत व गॅसचाही लाभ घेता येईल. प्रकल्पामुळे गावातील वातावरण व लोकांच्या आरोग्यावर काहीच दुष्परिणाम होणार नाही.- चंदन पाटील, मुख्याधिकार, नगर परिषद, गोंदिया

टॅग्स :Socialसामाजिक