शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ७२०० महिलांना प्रशिक्षण

By admin | Updated: April 19, 2017 00:10 IST

केंद्र शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत हस्तशिल्प विकास आयुक्तांच्या आदेशान्वये डॉ.बाबासाहेब आंबेडकर

कौशल्य विकास कार्यक्रम : गोंडी पेंटिंग, साडी वर्क व एम्ब्रॉयडरीचा समावेश सालेकसा : केंद्र शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत हस्तशिल्प विकास आयुक्तांच्या आदेशान्वये डॉ.बाबासाहेब आंबेडकर हस्तशिल्प विकास योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना आणि प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रशिक्षण, उत्पादन, विपणन केंद्र सुरु होणार आहेत. याचा पहिला टप्पा म्हणजे प्रशिक्षणाचा असून त्यासोबतच उत्पादन व विपणन सुद्धा करण्याचे काम करण्यात येईल. यांतर्गत जिल्ह्यात पुढील एका वर्षात सात हजार २०० पेक्षा जास्त महिलांना प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात तालुकावरस्तरावर केंद्र उभारण्यात येतील. याचे जिल्हा मुख्यालय सालेकसा येथे राहील अशी माहिती या योजेनेचे निदेशक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर उईके यांनी दिली. त्यांनी सांगितले की, गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एकूण ५ प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येतील, असे एकूण आठ तालुक्यात ४० प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येत आहेत. एका केंद्रावर एका वर्षात १८० लोकांना प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षणामध्ये गोंडी पेटींग, साडी वर्क आणि एम्ब्रायडरीचा समावेश असून कापड, केनवॉस आणि कागदावर गोंडी पेटींग बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच भिंतीवर सुद्धा गोंडी पेटींग बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. साडी वर्क अंतर्गत साडीवर वेगवेगळ्या प्रकारचे डिजाईन तयार करने, धागा वर्क इत्यादीच्या माध्यमातून साड्याना आकर्षक बनविण्याचे काम असते. एम्ब्रॉयडरी वर्क अंतर्गत कापडावर एम्ब्रॉयरडीच्या माध्यमातून वेगवेगवळ्या प्रकारच्या डिजाईन तयार करने, हँकरचिफ, बॅग, बेडशीट, टेबलक्लॉथ, पडदे इत्यादीवर डिजाईन काढण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचबरोबर नवसृजन कल्पनेतून नवनवीन कलात्मक वस्तुंच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येईल. प्रशिक्षण घेणाऱ्या महिला आपल्या स्तरावर आपल्या पद्धती आणखी काही इतर महिलांना सहज प्रशिक्षण देऊ शकतात. याचा सुद्धा अंदाज येत प्रधानमंत्री कौशल विकास कार्यक्रमांतर्गत येत्या २०२२ पर्यंत आपल्या जिल्ह्यातील ८४ हजार महिला प्रशिक्षीत होऊ शकतात. आणि तसा लाभ सुद्धा निर्धारित करण्यात आलेला आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना प्रशिक्षणानंतर उत्पादनाचे काम असेल. तसेच त्याचे विपणन सुद्धा त्याच केंद्रावरुन करण्यात येईल. तिन्ही प्रकारच्या जबाबदाऱ्या संबंधित संस्थेच्या असून प्रशिक्षीत महिलांना उत्पादन असलेल्या आधारावर आर्थिक लाभ मिळेल. तयार केलेला माल सुद्धा बाजारात विक्री करण्याची धडपड व पायपीट न करता संस्थेचे निदेशक या मालाची उचल करणार व केंद्र शासनाच्या भारतीय जनजातीय कार्य मंत्रालय अंतर्गत विपणन केंद्राला विक्री करणार. केंद्र शासनाचा विपणन केंद्रातून तो माल देश-विदेशात आपल्या स्तरावर निर्माण व विक्री करेल व ती जबाबदारी त्यांची राहील. त्याचप्रमाणे केंद्र शासनातील वस्त्र मंत्रालत आणि हस्तशील्प विकास विभागद्वारा केंद्रीय विपणन केंद्राला सुद्धा तयार केलेला नगदी भूगतानावर आधारित विपणन व्यवस्था करेल. अर्थात प्रशिक्षण उत्पादन आणि विपणन व्यवस्था एकमेकांशी निर्गमित असल्याने तयार केलेला माल विक्री करुन पैसे मिळणार अशी चिंता यात राहणार नाही. प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांचा किंवा पुरुषांचा समूह स्वत:च्या केंद्र स्थापित करुन सुद्धा प्रशिक्षण उत्पादन व विपणन या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.(तालुका प्रतिनिधी)