शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बांध तलावावर पर्यटनस्थळ

By admin | Updated: December 31, 2014 23:27 IST

गोंदिया शहरातील एका भागासाठी नेहमीच समस्येचे कारण ठरलेला बांध तलाव आता या परिसरातील नागरिकांसाठी आशेचे कारण ठरत आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या

गोंदिया : गोंदिया शहरातील एका भागासाठी नेहमीच समस्येचे कारण ठरलेला बांध तलाव आता या परिसरातील नागरिकांसाठी आशेचे कारण ठरत आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या पुढाकाराने भविष्यात बांध तलावाच्या सौंदर्यीकरणावर ७५ लाख रूपये खर्च करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. परंतु सदर प्रस्ताव देण्यासाठी सध्या सुरू असलेले ५९ लाख रूपये खर्चाचे काम पूर्ण होण्याची वाट पहावी लागणार आहे.गोंदिया शहरात मनोरंजनाचे कोणतेही साधन नाही. एवढ्या मोठ्या शहरात एकमात्र सुभाष बगिचा आहे. येथे नेहमी नागरिकांची गर्दी दिसून येते. परंतु हे स्थळसुद्धा सामान्य नागरिकांच्या आशा-आकांशांची पूर्तता करीत नाही. शहरातील जनतेच्या मनात उठणारे प्रश्न जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना मनासुद्धा उठले. मागील काही वर्षांपूर्वी जेव्हा सूर्याटोला येथील बांध तलावाच्या पुराने शहरात विनाशलिला पसरविली होती. काही काळापूर्वी याच परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने निधीसुद्धा मंजूर केला. या दरम्यान बांध तलावाचे निरीक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी सैनी गेले. त्यावेळी शहराशी लागूनच असलेला एवढा मोठा तलाव पाहून त्यांना आश्चर्य झाले. त्याचवेळी त्यांच्या मनात या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचा विचार निर्माण झाला.त्यांनी जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाचे संबंधित कनिष्ठ अभियंता यांना एक प्रस्ताव तयार करण्याचा तोंडी आदेश दिला होता. उल्लेखनिय म्हणजे या आदेशानंतर तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी ७५ लाख रूपये खर्च करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. नवीन प्रस्तावांतर्गत या तलावात भविष्यात नाव चालविली जावू शकते. येथे हिरवे वृक्ष लावण्यात येतील. बांध तलावाचे सौंदर्यीकरणसुद्धा होईल. नागपूर जिल्ह्यातील खिंडसीप्रमाणेच याचे विकास करण्याचा पुढाकार प्रस्तावाच्या माध्यमातून घेण्यात येईल. हे गोंदिया शहरासाठी एक मोठे उपहार ठरण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत या क्षेत्रात दरदिवशी जवळपास २०० नागरिक मार्निंग वॉकसाठी येतात. जर येथे सर्वकाही उपलब्ध होईल तर शहरातील नागरिकांसाठी ही मोठ्याच आनंदाची बाब ठरेल. परंतु हे सर्व मोफत मिळणार नाही. त्यासाठी थोडासा शुल्क द्यावा लागेल. एखाद्या कंत्राटदारावर या तलावाचे सौंदर्यीकरण करणे व त्या सौंदर्याला टिकवून ठेवण्याची जबाबदारी सोपविली जावू शकते. दिवसभर कामांच्या ओझ्यामुळे त्रस्त झालेल्यांना हे स्थळ शांती व आनंद प्रदान करण्यास यशस्वी ठरेल.या ठिकाणी आता सध्या गेट बनविले जात आहेत. वेस्टवेअरचे बांधकाम केले जात आहे. तलावाची पिचिंग सुरू आहे. तलावाच्या पाळीला मजबूत केले जात आहे. आपल्या वाहनांसह नागरिकांचे येथे ये-जा करण्याचे प्रयत्न सार्थक होवू लागले आहेत. आतापासूनच हे परिसर शहरातील नागरिकांना आकर्षिक करीत आहे. (प्रतिनिधी)