तीन जण झाले कोरोनामुक्त तर दोघांची पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:00 AM2020-07-08T05:00:00+5:302020-07-08T05:00:25+5:30

जिल्ह्यात आता एकूण ६५ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. जिल्ह्यात २५ जूनपासून सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंडीपार येथील मृतक वृध्दाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी चिंता वाढविली असतानाच आता विदेशातून आपल्या स्वगृही परत येणाऱ्या नागरिकांनी चिंता वाढविली आहे.

Three were coronated and two fell | तीन जण झाले कोरोनामुक्त तर दोघांची पडली भर

तीन जण झाले कोरोनामुक्त तर दोघांची पडली भर

Next
ठळक मुद्देकोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा ६५ वर : ६०५ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम असताना मंगळवारी (दि.७) पुन्हा दोन कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली. तर तीन कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आता एकूण ६५ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.
जिल्ह्यात २५ जूनपासून सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंडीपार येथील मृतक वृध्दाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी चिंता वाढविली असतानाच आता विदेशातून आपल्या स्वगृही परत येणाऱ्या नागरिकांनी चिंता वाढविली आहे. मंगळवारी आढळलेले दोन कोरोना बाधित रुग्ण हे बाहेरुनच आले आहे. यापैकी एक जण बंगलोर येथून तर दुसरा दुबई येथून आला होता. या दोघांनाही गोंदिया स्वागत लाईन येथील क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले होते. मंगळवारी (दि.७) या दोघांचेही स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर टाकली असताना कोविड केअर सेंटरमधील तीन कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने थोडा दिलासा देखील मिळाला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण बेरे होण्याचे प्रमाण चांगले असून आतापर्यंत एकूण ११८ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. सध्या स्थितीत जिल्ह्यात एकूण ६५ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा १८५ वर पोहचला आहे.

४५२२ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४७०७ जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी १८५ जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ४५२२ नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून ६१४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि मेडिकलला प्राप्त व्हायचा आहे.

Web Title: Three were coronated and two fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.