शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्राची तपासणी करण्यासाठी तीन भरारी पथक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर सध्या खरीप हंगामातील धान खरेदी सुरू आहे. मात्र यंदा धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढली आहे. यामुळे या दोन्ही विभागाचे नियोजन फसल्याचे चित्र आहे. तर काही केंद्रावर खरेदी करण्यासाठी लागू केलेल्या निर्देशांचे सुध्दा उल्लघंन केले जात होते.

ठळक मुद्देराईस मिलची करणार पाहणी : खरेदी केंद्रावरील सावळा गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत जिल्ह्यात एकूण ६६ शासकीय धान खरेदी केंद्रावरुन हमीभावानुसार धान खरेदी करण्यात येत आहे.मात्र अनेक केंद्रावर नियमांचे उल्लघंन आणि भरडाईच्या प्रक्रियेत घोळ होत असल्याची ओरड वाढली होती. लोकमतने सुध्दा हा मुद्दा लावून धरला होता. याची दखल घेत शासनाने मुंबई आणि पुणे येथील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या अधिकाऱ्यांचे तीन भरारी पथक तयार करुन ते गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात पाठविले आहे. या पथकाने बुधवारपासून केंद्रांना भेटी देऊन तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे फेडरेशनचे अधिकारी आणि राईस मिलर्समध्ये खळबळ उडाली आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर सध्या खरीप हंगामातील धान खरेदी सुरू आहे. मात्र यंदा धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढली आहे. यामुळे या दोन्ही विभागाचे नियोजन फसल्याचे चित्र आहे. तर काही केंद्रावर खरेदी करण्यासाठी लागू केलेल्या निर्देशांचे सुध्दा उल्लघंन केले जात होते. तर काही केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांकडून धान खरेदी केली जात होती. तर खरेदी केंद्रावर आवश्यक सोयी सुविधांचा अभाव होता.लोकमतने सुध्दा हा विषय लावून धरला होता. याची दखल घेत शासनाने या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी मुंबई आणि पुणे येथील अधिकाऱ्यांचा समावेश असलेले तीन भरारी पथक तयार करुन ते गोंदिया आणि भंडारा येथे पाठविले आहे.या भरारी पथकाने बुधवारी (दि.५) जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडून खरेदी केंद्राची यादी घेऊन केंद्राना प्रत्यक्ष भेट देऊन चौकशीला सुरूवात केली आहे.या पथकाला १३ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण केंद्राना भेटी देऊन त्याचा अहवाल गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करायचा आहे.शासनाने चौकशीसाठी ठरवून दिलेल्या गोष्टींचे बारीक निरीक्षण करायचे आहे. तसेच केंद्रावरील धानाची भरडाई करण्यासाठी करार केलेल्या राईस मिलला भेट देऊन नियमानुसार भरडाई करुन सीएमआर तांदूळ जमा केला जात आहे किंवा नाही याची चाचपणी करायची आहे. यामुळे सध्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि राईस मिलर्समध्ये खळबळ उडाली आहे.पथक करणार या गोष्टींची चाचपणीशासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाºया शेतकऱ्यांचे सातबारा,पीक पेरा प्रमाणपत्र,ऑनलाईन नोंदणी, शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या धानाचे चुकारे ऑनलाईन करण्यात येत आहे किंवा नाही, खरेदी केंद्रावर शासनाच्या निर्देशानुसार सोयी सुविधा पुरविल्या जात आहे किंवा नाही. ज्या गावाचा ज्या केंद्रामध्ये समावेश आहे त्याच केंद्रावर धानाची विक्री केली जात आहे किंवा नाही. राईस मिलर्सना भरडाईसाठी दिलेल्या सीएमआर तांदूळ दिलेल्या मुदतीत जमा करण्यात आला किंवा नाही याची चौकशी हे पथक करणार आहे.जमा केलेल्या तांदळाची गुणवत्ता तपासणारप्रशासनाने करार केलेल्या राईस मिलर्सनी खरेदी केंद्रावरुन ज्या धानाची उचल केली. त्याच धानाची भरडाई करुन तोच तांदूळ जमा करण्यात आला किंवा नाही. बाहेरील राज्यातील धान आणून त्याची भरडाई करुन तांदूळ तर जमा करण्यात आला नाही ना याची देखील भरारी पथकातील अधिकारी पाहणी करणार आहे.त्यामुळे भरारी पथक नेमका काय अहवाल सादर करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड