शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाचे होतेय कम बॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

यंदा मृग आणि त्यानंतरच्या पावसाच्या दोन नक्षत्रांनी शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे पेरणी आणि रोवणीची कामे लांबणीवर पडली होती. तर काही शेतकऱ्यांनी दरवर्षीचा पावसाचा अंदाज घेत धूळ पेरणी केली होती. मात्र जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते.

ठळक मुद्देबळीराजाची चिंता दूर : रोवणीला येणार थोडा वेग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जून महिन्यात पाठ फिरविलेल्या पावसाने जुलै महिन्यात सुरूवातीपासूनच दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात पावसाचे कमबॅक झाल्याने बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे.मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने रोवणीच्या कामाला सुध्दा काही प्रमाणात वेग आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास खरिपातील पिकांना सुध्दा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.यंदा मृग आणि त्यानंतरच्या पावसाच्या दोन नक्षत्रांनी शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे पेरणी आणि रोवणीची कामे लांबणीवर पडली होती. तर काही शेतकऱ्यांनी दरवर्षीचा पावसाचा अंदाज घेत धूळ पेरणी केली होती. मात्र जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते.या पिकाला सर्वाधिक पाण्याची गरज असते. पण यंदा सुरूवातीपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम कसा होणार अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित होती. तर ८ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ २३ टक्के रोवणी आटोपली होती. त्यामुळे उर्वरित रोवणी कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला होता.मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून पाऊस अधून मधून हजेरी लावत असल्याने रोवणीच्या कामासाठी याची मदत होत आहे. गुरूवारी (दि.९) सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडे आनंदाचे वातवरण होते. सालेकसा तालुक्यात सुध्दा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे या भागात काही ठिकाणी झाडांची पडझड झाल्याची माहिती आहे. हवामान विभागाने सुध्दा पुढील दोन दिवस दमदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाचे कमबॅक होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती