शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

‘त्या’ वृद्धाच्या संपर्कातील व्यक्तींने वाढविले टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 5:00 AM

गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील एका ६४ वर्षीय वृध्दाचा २५ जून रोजी नागपूर येथील मेडिकलमध्ये मृत्यू झाला. या वृध्दाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून या मृतकाच्या संपर्कात आलेल्या ७० ते ८० जणांना आतापर्यंत क्वारंटाईन करुन त्यांचे स्वॅब नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. यापैकी जवळपास ३० जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.

ठळक मुद्देआणखी आठ कोरोना बाधितांची भर : अ‍ॅक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या पोहचली ५८ वर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील आठवडाभरापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याचे चित्र आहे. शनिवारी (दि.४) पुन्हा ८ जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा ५८ वर पोहचला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील एका ६४ वर्षीय वृध्दाचा २५ जून रोजी नागपूर येथील मेडिकलमध्ये मृत्यू झाला. या वृध्दाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून या मृतकाच्या संपर्कात आलेल्या ७० ते ८० जणांना आतापर्यंत क्वारंटाईन करुन त्यांचे स्वॅब नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. यापैकी जवळपास ३० जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर शनिवारी आणखी याच वृध्दाच्या संपर्कात आलेल्या ७ जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले.त्यामुळे गोंदिया तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून हा तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट होत चालला आहे. शनिवारी आढळलेल्या एकूण आठ कोरोना बाधितांमध्ये ७ गोंदिया तालुक्यातील तर तिरोडा तालुक्यातील बेरडीपार येथील एका रुग्णाचा समावेश आहे.कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यातील एकूण अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधितांचा आकडा ५८ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत एकूण १६४ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून यापैकी १०४ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत एकूण ३७१३ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले असून यापैकी १६४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.तर ३५४९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर १२८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त व्हायचा आहे.कुंभारे नगरातील कोरोना बाधितांची संख्या १३ वरमुंडीपार येथील मृतक वृध्दाच्या संपर्कात आलेल्यांपैकी आतापर्यंत एकूण ३८ जणांना कोरोनाचा लागण झाली आहे. यातील १३ कोरोना बाधित हे कुंभारे नगरातील आहे. या भागात रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान नगर परिषदेने शनिवारपासून या भागात आरोग्य विषयक सर्वेक्षण सुरू केले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या