शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-गोंदिया पॅसेजरवर वाढतोय प्रवाशांचा ताण

By admin | Updated: February 7, 2015 23:26 IST

ईतवारी (नागपूर) ते गोंदिया रेल्वे स्थानकादरम्यान प्रवासी वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या पॅसेंजर गाड्या ‘हाऊसफुल्ल’ होऊन प्रवाशांना मोठा

गोंदिया : ईतवारी (नागपूर) ते गोंदिया रेल्वे स्थानकादरम्यान प्रवासी वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या पॅसेंजर गाड्या ‘हाऊसफुल्ल’ होऊन प्रवाशांना मोठा त्रास सहन करून कसातरी प्रवास करावा लागतो. त्यामुळे या स्थानकांदरम्यान पॅसेंजर गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी जोर धरत आहे. त्यासाठी १५ तास ईतवारी रेल्वेस्थानकात उभ्या राहणाऱ्या टाटानगर पॅसेंजरचा वापर करावा, अशी मागणी काही सूज्ञ रेल्वेप्रवाशांनी केली आहे.टाटानगर-ईतवारी (५८१११) ही रेल्वे गाडी गोंदिया स्थानकावर पहाटे ३.२० वाजता येते व पहाटे ३.३० वाजता सुटते. सकाळी ६ वाजतापर्यंत सदर गाडी ईतवारी रेल्वे स्थानकात पोहचते. त्यानंतर आपल्या परतीच्या प्रवासाठी सदर गाडी (५८११२) ईतवारी स्थानकातून टाटानगरसाठी रात्री ९.३० वाजता सुटते. ही गाडी दिवसभर तब्बल १५ तासपर्यंत इतवारी रेल्वे स्थानकावर थांबूनच असते. या कालावधी सदर गाडीचा उपयोग करून प्रवाशांना सेवा दिली जावू शकते.सदर गाडी १५ तास ईतवारी रेल्वे स्थानकावर अकारण थांबून राहत असल्याने रेल्वेच्या महसुलात कोणतीही वाढ होत नाही. मात्र या कालावधीत सदर गाडीच्या ईतवारी ते गोंदिया जंक्शनपर्यंत दोन फेऱ्या होवू शकतात. त्यामुळे प्रवाशांनाही सुविधा होईल व रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडेल, अशी गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांची आशा आहे. गोंदिया ते ईतवारी रेल्वे स्थानकादरम्यान पॅसेंजर गाडीचे गंगाझरी, काचेवानी, तिरोडा, मुंडीकोटा, तुमसर रोड, कोका, भंडारा रोड, खात, रेवराल, चाचेर, सालवा, कन्हान, कामठी, कलमना इत्यादी थांबे येतात. येथून मोठ्या प्रमाणात प्रवाशी बसतात. शिवाय गोंदिया व इतवारी या थांब्यांवरून बसणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठीच असते. त्यामुळे टाटानगर-ईतवरी या पॅसेंजर गाडीचा उपयोग दिवसा ईतवारी ते गोंदिया प्रवाशाच्या दोन फेऱ्यासाठी केला जावू शकते. त्यामुळे गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील प्रवाशी लाभान्वित होतील व रेल्वेच्या महसुलातही भर होईल. त्यामुळे सदर गाडीच्या ईतवारी ते गोंदिया दरम्यान फेऱ्या वाढविण्याची मागणी होत असून लोकप्रतिनिधी व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)