शिक्षकदिनी जि.प.समोर धरणे आंदोलन

By Admin | Updated: August 31, 2015 01:38 IST2015-08-31T01:38:47+5:302015-08-31T01:38:47+5:30

शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकांना कामचुकार असे अपमानास्पद शब्द वापरल्यामुळे त्यांनी आपले शब्द मागे घ्यावे तसेच शिक्षकांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावाव्यात यासाठी

Teacher movement in front of the Zilla Parishad | शिक्षकदिनी जि.प.समोर धरणे आंदोलन

शिक्षकदिनी जि.प.समोर धरणे आंदोलन


ंगोंदिया : शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकांना कामचुकार असे अपमानास्पद शब्द वापरल्यामुळे त्यांनी आपले शब्द मागे घ्यावे तसेच शिक्षकांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावाव्यात यासाठी आ. कपिल पाटील शिक्षक दिनी मुंबईच्या कामगार मैदानावर एक दिवसाचा उपवास करणार आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक भारती गोंदियातर्फे करण्यात आले आहे. तसेच सदर दिनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेसमोर होणाऱ्या धरणे आंदोलनात शिक्षक मंत्र्यांनी शिक्षकांना वापरलेला अपमानास्पद शब्द मागे घ्यावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, आॅफलाईन पगार आॅनलाईन करावा, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, सरलची डोकेदुखी बंद करा, वर्ग एक ते आठवीच्या सर्व मुलांना मोफत गणवेश द्यावा, सर्व मुलींना उपस्थिती भत्ता एक रुपयांवरुन पाच रुपये करण्यात यावा, सावित्री, फातिमा, कैसलेस आरोग्य योजना सुरू करावी, कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा प्रस्तावाला मंजुरी देऊ नये, शिक्षणाचा हक्क साबूत ठेवा, शिक्षकाच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. शिक्षक भारतीतर्फे शिक्षकदिनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर शालेय कामकाजानंतर एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहेत. या धरणे आंदोलनाला शिक्षकांनी अधिक संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर, जितेंद्र घरडे, परेश बिसेन, गुलाब मौदेकर, चक्रेल, के.एफ. बहेकार, संतोष बारेवार, सुखचंद बिसेन, नरेंद्र बांते, विलास डोंगरे व इतर सदस्यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी )

Web Title: Teacher movement in front of the Zilla Parishad