शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांत करावी लागणार ११ कोटींची करवसुली

By admin | Updated: October 18, 2014 01:37 IST

आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या नगर पालिकेला कर स्वरूपातून होणाऱ्या आवकचा मुख्य हातभार लागतो.

गोंदिया : आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या नगर पालिकेला कर स्वरूपातून होणाऱ्या आवकचा मुख्य हातभार लागतो. मात्र मागील सहा महिन्यांत पालिकेच्या कर विभागाने फक्त एक कोटी आठ लाख ५४ हजार ४६७ रूपयांची कर वसूली केली आहे. मागील कित्येक वर्षांपासून शहरवासीयांकडे सात कोटी १५ लाख ६६ हजार १३३ रू पये थकून आहेत. तर सन २०१४-१५ या चालू वर्षात तीन कोटी ९४ लाख ३६ हजार ३९५ रूपयांचा कर आकारण्यात आला आहे. अशाप्रकारे पालिकेच्या कर विभागाला या पाच महिन्यांच्या कालावधीत ११ कोटींची वसूली करायची आहे. तर विभागाला एवढी रक्कम वसूल करणे शक्य नसल्याचे ठाऊक असल्याने त्यांनी सहा कोटी वसूल करण्याचे उद्दीष्ट पुढे ठेवले आहे. राजकीय हस्तक्षेप म्हणा की शहरवासीयांची अनास्था पालिका कर वसूलीत फेल ठरते. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षातही कर विभागाला पाहिजे तशी वसूली करता आली नाही. तर सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आल्याने कर विभागातील कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. शिवाय आता विधानसभेच्या निवडणुका आल्या व कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटी लागल्याने हा काळही त्यांच्या हातून गेला. परिणामी कर विभागाने एप्रिलपासून अद्याप एक कोटी आठ लाख ५४ हजार ४६७ रूपयांचीच कर वसूली केली. पालिकेच्या कर विभागात सुमारे २५ कर्मचारी असून त्यांच्यावर शहरातील ४० वॉर्डांतील वसूली करण्याची जबाबदारी आहे. काही कर्मचाऱ्यांना तर तीन वॉर्डांतील वसूली करावी लागते. या व्यतीरिक्त त्यांना कार्यालयीन कामे करावी लागतात. त्यात निवडणुका आल्यास वेगळीच फसगत होते व तोच प्रकार या वर्षात घडला. परिणामी पाहिजे तशी वसूली करता आली नाही. त्याचा परिणाम अनुदानावर होण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)