शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्य आठ कोटी मालमत्ता करवसुलीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:00 IST

मालमत्ता कर वसुलीच्या कामात नगर परिषद सुरूवातपासूनच मागे राहिलेली असल्याचे दिसत आहे.बड्या लोकांचा दबाव तर कधी राजकारण्यांची अडसर येत असल्याने मालमत्ता कर वसुली रखडत गेली व आज मागणीपेक्षा थकबाकी जास्त अशी परिस्थिती बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देअद्याप फक्त १.८१ कोटींची वसुली : मागणीपेक्षा थकबाकीच जास्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेला सर्वात कठीण काम असलेल्या मालमत्ता कर वसुलीचा अंतिम टप्पा आता सुरू झाला असून यंदा नगर परिषदेला नऊ कोटी ८२ लाख पाच हजार ४५० रूपयांची कर वसुली करावयाची होती. त्यातील अद्याप फक्त एक कोटी ८१ लाख ५९ हजार ५५९ रूपयांचीच कर वसुली झाली आहे. म्हणजेच, नगर परिषदेला ३१ मार्चपर्यंत आठ कोटी ४५ हजार ८९१ रूपये मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट सर करावयाचे आहे.मालमत्ता कर वसुलीच्या कामात नगर परिषद सुरूवातपासूनच मागे राहिलेली असल्याचे दिसत आहे.बड्या लोकांचा दबाव तर कधी राजकारण्यांची अडसर येत असल्याने मालमत्ता कर वसुली रखडत गेली व आज मागणीपेक्षा थकबाकी जास्त अशी परिस्थिती बघावयास मिळत आहे. यंदा नगर परिषदेला पाच कोटी १८ लाख ६६३ रूपयांची मागील थकबाकी तर चार कोटी ६४ लाख चार हजार ७८७ रूपयांची मागणी असे एकूण नऊ कोटी ८२ लाख पाच हजार ४५० रूपये मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट होते.त्यात नगर परिषदेने आतापर्यंत एक कोटी ८१ लाख ५९ हजार ५५९ रूपयांची कर वसुली केली आहे. म्हणजेच, आता नगर परिषदेला ३१ मार्चपर्यंत आठ कोटी ४५ हजार ८९१ रूपयांची कर वसुली करावयाची आहे. मध्यंतरी शासनाने १०० कर वसुलीचे आदेश काढले होते. मात्र तेवढी कर वसुली होणे शक्य नाही. शिवाय नगर परिषद कर विभागात तेवढे मनुष्यबळ नसल्यानेही कर वसुलीत अडचण येते. शिवाय, कर वसुलीसाठी अधिकारी सोबत असल्यास कर्मचारीही जोमात राहतात, त्यामुळे कर वसुलीचा आकडा वाढतो.मात्र नगर परिषदेत त्यासाठी पुढाकार घेणारा कुणीही दिसत नाही. अशात कित्येकदा कर वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना रिकाम्या हातीच परतावे लागते. आता जानेवारी महिना अर्धा निघून गेला आहे. म्हणजेच, अडीच महिने आता कर वसुलीसाठी उरले असून या कालावधीत नगर परिषदेची किती टक्के मालमत्ता कर वसुली होते हे बघायचे आहे.जानेवारी महिन्यात फक्त १२ लाखांची वसुलीडिसेंबर महिन्यात सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे पदभार असताना कर वसुली विभागाने मोहिम छेडून ३९ लाख ६७ हजार ५०३ रूपयांची कर वसुली केली होती. याशिवाय, बाजार विभागानेही मोठी रक्कम वसुलीतून उभी केली होती. आता घुगे यांचा कार्यकाळ संपला असून जानेवारी महिन्यातील १५ दिवसांत मात्र फक्त १२ लाख रूपयांची कर वसुली झाल्याची माहिती आहे. म्हणजेच, घुगे यांच्या कार्यकाळात कर वसुलीच चांगली झाली असल्याचे दिसते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका