शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातून चोरी झालेला टँकर नवेगावबांध येथे सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST

स्टेशन डायरी ड्युटीवर असलेल्या पोलीस हवालदार साबीर शेख यांनी ठाणेदार बाबासाहेब बोरसे यांना याबद्दल त्वरित माहिती दिली. त्यांनी टँकरचा शोध घेण्यासाठी पोलीस हवालदार साबीर शेख, अनंत तुलावी, पोलीस शिपाई दीपक कराड, चालक सहाय्यक फौजदार सयाम यांचे पथक तयार करून त्यांना रवाना केले. त्यानुसार, पथक टँकरचा शोध घेत असताना नवेगावबांध-गोठणगाव मार्गावर गोठणगावच्या दिशेने जाताना टँकर दिसला असता चालकास वाहन थांबविण्याचा इशारा पोलिसांनी केला. 

ठळक मुद्देपलटूदेव पहाडीजवळ घेतला ताब्यात : चालक टँकर सोडून जंगलात पसार

  लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : नागपूर येथील कपिल नगर पोलीस ठाण्यात चोरीची नोंद असलेला टँकर येथील पलटूदेव पहाडी परिसरातून  नवेगावबांध पोलिसांनी ताब्यात घेतला. गुरूवारी (दि.१०) ही कारवाई करण्यात आली असून चालक पोलिसांना बघून जंगलात पसार झाला. प्राप्त माहितीनुसार गुरूवारी (दि.१०) नवेगावबांध  पोलीस ठाण्यात नागपूर येथील राजू शिवहरे नामक व्यक्तीने भ्रमणध्वनीवरून नागपूर येथे अज्ञात इसमाने चोरून नेलेला  टँकर  क्रमांक  एमएच ४६- बीएम २३१२ नवेगावबांध परिसरात  असल्याचे  जीपीएसद्वारा दिसत असल्याची माहिती सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास  दिली. स्टेशन डायरी ड्युटीवर असलेल्या पोलीस हवालदार साबीर शेख यांनी ठाणेदार बाबासाहेब बोरसे यांना याबद्दल त्वरित माहिती दिली. त्यांनी टँकरचा शोध घेण्यासाठी पोलीस हवालदार साबीर शेख, अनंत तुलावी, पोलीस शिपाई दीपक कराड, चालक सहाय्यक फौजदार सयाम यांचे पथक तयार करून त्यांना रवाना केले. त्यानुसार, पथक टँकरचा शोध घेत असताना नवेगावबांध-गोठणगाव मार्गावर गोठणगावच्या दिशेने जाताना टँकर दिसला असता चालकास वाहन थांबविण्याचा इशारा पोलिसांनी केला. परंतु टँकर न थांबविता चालक वेगाने गोठणगावच्या दिशेने निघाला. तसेच पोलीस आपल्या मागावर आहेत हे लक्षात येताच पलटूदेव पहाडी समोर टँकर चालू स्थितीत सोडून लगतच्या जंगलात पळ काढला. जंगल परिसर दाट असल्याने त्याचा शोध लागला नाही. मात्र पथकाने पंचांसमक्ष टँकरच्या कॅबिनची पाहणी केली असता चालकाच्या सीटजवळ जानिकराम चौधरी (रा.चित्तेगाव, चिखली, चंद्रपूर) या इसमाचे आधारकार्ड मिळाले. टँकरचा दोन पंचांसमक्ष पंचनामा करून टँकरमध्ये  मिळालेले आधारकार्ड ताब्यात घेऊन टँकर पुढील कारवाई करिता येथील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.

 

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस