शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानीचे त्वरित सर्वेक्षण करा

By admin | Updated: May 3, 2016 02:04 IST

पालकमंत्री राजकुमार बडोले हे रविवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी गोरेगाव तालुक्यातील डव्वा, सटवा,

गोंदिया : पालकमंत्री राजकुमार बडोले हे रविवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी गोरेगाव तालुक्यातील डव्वा, सटवा, गणखैरा व दवडीपार या गावातील नैसिर्गक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या घरांची व शेतीची पाहणी करुन शेतकऱ्यांना व कुटुंब प्रमुखांना धीर दिला. झालेल्या नुकसानीची माहिती नुकसानग्रस्तांकडून जाणून घेतली. २७ एप्रिलच्या रात्री आलेल्या वादळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील अनेक गावातील घरांचे व शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. पालकमंत्र्यांनी २८ एप्रिल रोजीच जिल्हा प्रशासनला झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने त्यांनी रविवारी नुकसानग्रस्त डव्वा येथील श्यामराव मेश्राम व सुमेंद्र कटरे, सटवा येथील पुरणलाल ठाकुर, गणखैरा येथील नुखलाल पारधी यांच्या नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली.सटवा येथील शेतकरी मोडकू बघेले, दवडीपार येथील शेतकरी भाकचंद कटरे यांच्या नुकसान झालेल्या धान पिकाच्या शेतीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी शेतीच्या व घराच्या नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करावे, त्यामुळे नुकसानग्रस्तांना शक्य तेवढ्या लवकर मदत करता येईल असे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांना सांगीतले. नुकसानग्रस्त गावांची पाहणी करतांना पालकमंत्र्यांसोबत आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी हरिणखेडे, पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी, जिल्हा परिषद सदस्य वरखेडे, सटवा सरपंच रमेश ठाकूर, पोलीस पाटील टिकाराम रहांगडाले, विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ.के.टी. कटरे, माजी सरपंच महादेव वाणे, भागचंद रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)गोंदिया, गोरेगाव, तिरोडा व आमगाव तालुक्याला फटका४२७ एप्रिल रोजी आलेला वादळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील २२ गावांतील ९२१ घरांचे ४७ लाख ३४ हजार रु पयांचे नुकसान तर ३१८ हेक्टर शेतातील पिकांचे नुकसान झाले. गोंदिया तालुक्यातील १८ गावातील ९६ घरांचे व २० हेक्टर शेतीचे, तिरोडा तालुक्यातील ३ गावांतील १४ घरांचे आणि आमगाव तालुक्यातील ३४ घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.