शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

नूतन विद्यालयाच्या संचालक मंडळावर कारवाई करा

By admin | Updated: October 5, 2015 02:05 IST

नूतन महाराष्ट्र विद्या विकास मंडळ या संस्थेचे सचिव रविंद्र भालेराव यांनी शाळेमध्ये शिक्षकाची नौकरी लावून देतो म्हणून २७ लोकांकडून १.२० कोटी रूपये गोळा केले. ...

पत्रपरिषद : अन्यथा मालमत्ता गोठवा भंडारा : नूतन महाराष्ट्र विद्या विकास मंडळ या संस्थेचे सचिव रविंद्र भालेराव यांनी शाळेमध्ये शिक्षकाची नौकरी लावून देतो म्हणून २७ लोकांकडून १.२० कोटी रूपये गोळा केले. काहिंना शाळा सुधार निधीसाठी पैसे द्यावे लागतात असे सांगितले. या संपूर्ण प्रकरणात संस्थेचे पदाधिकारी लिप्त असून विद्यालयाच्या संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी पिडितांनी आज दुपारी २.३० वाजता विश्रामगृहात आयोजित पत्र परिषदेत केली.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, प्रकरण चव्हाट्यावर आल्यावर संस्थेचे अध्यक्ष मुकुंद वझलवार व संचालकद राधेश्याम लाहोटी यांनी रविंद्र भालेराव यांचा संस्थेशी काही सबंध नाही, असे सांगितले. प्रत्यक्षरीत्या संस्था व शाळेच्या नावावर सचिवाने सन २००९ पासून केलेल्या कार्याची व संबंधित पीडितांनी याची माहिती दोघांना वेळीच दिली होती. आता, सचिवाचा संस्थेशी काहीच सबंध नाही असे म्हणने सपेशल चुकीचे आहे. रवीन्द्र भालेराव हे संस्थेचे सचिव असल्यामुळे त्यांनी सदर रक्कम स्वीकारली. याची कल्पना वझलवार यांना होती. तसेच २०१० मध्ये काही पिडितांच्या पाल्यांबरोबर जानेवारी २०१० मध्ये घेतलेल्या उमेदवारांपैकी केवळ एन.आर. डोकरीमारे,, एस.ए. नागपुरे, ओ.पी. खंडाईत, ए.पी. सुरदुसे यानांच नियुक्ती आदेश देण्यात आले. डोकरीमारे, नागपुरे यांची नेमणूक केवळ अध्यक्षांच्या मर्जीनुसार झाली असल्याचेही पीडितांनी निवेदनात नूाुद केले आहे. तसेच याचीसुद्धा चौकशी संस्थेने केली काय, असा सवालही उपस्थित केला आहे.संचालक मंडळाने दिशाभूल न करता सर्व पीडितांचे पैसे परत करावेत अन्यथा शासनाने संस्थेची, शाळेची मालमत्ता व संस्थेच्या संचालक मंडळाची मालमत्ता ताब्यात घेऊन पैसे परत करावे, तसेच अन्य सदस्यांविरूद्ध गुन्हा दाखल अटक करावी, अशी मागणी केली आहे. पत्रपरिषदेला रा.न. श्रावणकर, पुंडलिक मानकर, रामचंद्र लांडगे, कल्पना गिऱ्हेपुंजे, झितेश वैरागडे, दिलीप कुळकर्णी, सुभाष बडवाईक, यशवंत पंचबुद्धे, एकनाथ हटवार, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)