शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रमातच सोशल मीडिया असावे

By admin | Updated: June 14, 2014 23:39 IST

इंटरनेटच्या मृगजळाने वेढलेल्या जगात वाढलेल्या सायबर क्राईमला कसे कुलूपबंद करणार, असा प्रश्न सध्या सर्वत्र निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न सर्वव्यापी होत आहे. वास्तविक यातील अर्धवट ज्ञानामुळेच

तज्ज्ञांचा सूर : कायद्याची अंमलबजावणी व इंटरनेट साक्षरतेवर भर, पालक व मुलांना लोकशिक्षणाची गरज
मनोज ताजने/नरेश रहिले - गोंदिया
इंटरनेटच्या मृगजळाने वेढलेल्या जगात वाढलेल्या सायबर क्राईमला कसे कुलूपबंद करणार, असा प्रश्न सध्या सर्वत्र निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न सर्वव्यापी होत आहे. वास्तविक यातील अर्धवट ज्ञानामुळेच जास्त समस्या निर्माण होतात. त्यामुळे याला एक सामाजिक समस्या समजून याबाबतचे योग्य ज्ञान देणारी माहिती अभ्यासक्रमातच समाविष्ठ करावी, अशी सूचना मान्यवरांनी ‘लोकमत’ परिचर्चेत केली.
‘सोशल मीडियाचा वापर आणि गैरवापर‘ यावर लोकमतने परिचर्चा घडवून आणली. समाजविघातक ठरू शकणाऱ्या बाबीवर प्रतिबंध घालणे शक्य आहे, मात्र पालकांनी इंटरनेट, मोबाईलचा वापर आपला पाल्य नेमका कशासाठी करतो आहे यावर लक्ष ठेवणे जास्त गरजेचे आहे. केवळ कौतुक म्हणून मुलांच्या हाती स्मार्ट फोन न देता त्यांना त्याची खरच गरज आहे हे पालकांनी तपासले पाहीजे, असा सूर लोकमत परिचर्चेत वक्त्यांनी मांडला.
गुन्हेगारी ही वृत्ती असून ही वृत्ती घालविण्यासाठी समाजमनाचे प्रबोधन करावे लागणार आहे. कायद्याचे सातत्याने पुनर्विलोकन, कठोर अंमलबजावणी व शिक्षा होणे आवश्यक असल्याबद्दल सर्वांचेच एकमत होताना दिसते. गोंदियासारख्या ठिकाणी सायबर क्राईमचे गुन्हे नोंदविण्यासाठी स्वतंत्र सेल नाही. कारण या प्रकारचे गुन्हे कसे होतात याची माहितीच अनेकांना नाही. परंतू भविष्यात सर्व ठिकाणी त्याची गरज पडणार आहे. सोशल मीडियात अभिव्यक्तीचा हुंकार सहजपणे व्यक्त होतो. त्याला कोणताही आडपडदा नाही, की कुणी सेन्सॉर नाही. तो आपल्या मनात सुरू असलेली घालमेल, भावभावनांची आंदोलने क्षणार्धात जगाच्या कॅन्व्हॉसवर उमटवू शकतो. त्याच्या मनात सुरू असलेल्या द्वंद्वाला क्षणार्धात प्रत्युत्तर व प्रतिसादही मिळतो. मग तो कधी सकारात्मक तर कधी नकारात्मकही असतो. या तंत्रज्ञानामुळे संवादात क्रांती झाली. संवादाने समाज जोडला जातो तसा तो सहज तोडण्याची व विध्वंस घडविण्याची मोठी शक्ती या माध्यमात असल्याचे दिसून येते. याचा सकारात्मक उपयोग करायचा असेल तर त्यासाठी प्रत्येकाने या तंत्रज्ञानाच्या बाबतीत किमान ज्ञान मिळविणेही गरजेचे असल्याचा सूर या परिचर्चेत उमटला.