शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सहायक खरेदी पर्यवेक्षकाचा मनमर्जी कारभार

By admin | Updated: March 11, 2016 02:23 IST

नगर परिषदेच्या अति महत्वपूर्ण अशा खरेदी विभागात कार्यरत सहायक खरेदी पर्यवेक्षक नियमांना धुडकावून आपला ...

दोन महिन्यांपासून सुट्टीवर : १५ दिवसांनी पाठविला अर्ज, पालिकेकडून कारवाई शून्य गोंदिया : नगर परिषदेच्या अति महत्वपूर्ण अशा खरेदी विभागात कार्यरत सहायक खरेदी पर्यवेक्षक नियमांना धुडकावून आपला मनमर्जी कारभार करीत असल्याचे दिसून येत आहे. दोन जानेवारीपासून सुट्टीवर असलेल्या महोदयांनी सुट्टीवर गेल्यानंतर १५ दिवसांनी आपला अर्ज ई-मेलद्वारे पाठविल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे हा त्यांचा नेहमीचाच तोरा असून नगर परिषद प्रशासन मात्र काहीच कारवाई करीत नसल्याचे दिसते. आपला मनमर्जी कारभार करीत असलेल्या या कर्मचाऱ्यावर पालिका प्रशासनाची मेहरबानी बघून कोठेतरी काही शिजत असल्याचे आता खुद्द नगर परिषदेच्या वर्तुळातच बोलले जात आहे. नगर परिषद कार्यालयातील साहीत्य खरेदीसाठी करण्यासाठी एक विशेष विभागच आहे. या विभागामार्फतच पालिकेला लागणाऱ्या साहित्यांची खरेदी केली जाते. यात वर्षभराचे छापील साहीत्य, फर्निचर व इतर साहीत्यांचा यात समावेश होतो. आता या सर्व साहीत्यांसाठी निविदा मागविण्याची ही वेळ आहे. असे असताना मात्र विभागाचे सहायक पर्यवेक्षक प्रदीप खोब्रागडे २ जानेवारीपासून वैद्यकीय रजेवर गेले असल्याची माहिती आहे. यातही त्यांचा मोठेपणा असा की, सुट्टीवर गेल्याच्या १५ दिवसांनंतर त्यांनी आपला अर्ज मेलवर पाठविला आहे. डिसेंबर महिन्यातही ते दोन-चार दिवसच कामावर, एवढेच नव्हे तर सन २०१४-१५ मध्येही ते जानेवारी ते मार्च पर्यंत सुट्टीवर गेले होते असेही कळले. आपल्या मनमर्जीप्रमाणे खोब्रागडेंचा कारभार सुरू असल्याने मात्र नगर परिषदेची कामे खोळंबली आहेत. याचा दैनंदिन कामांवरही परिणाम होत आहे. खोब्रांगडेसह अन्य काही कर्मचारीही आपल्या मर्जीनेच कारभार करीत असल्याचीही माहिती आहे. मात्र खोब्रागडेंनी यात हद्दच पार केली असल्याचे दिसत असून ही त्यांची पहिली वेळ नसून नेहमीचाच तोरा आहे. असे असतानाही मात्र पालिका प्रशासनाकडून खोब्रागडेंवर काहीच कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसते. एका कर्मचाऱ्यावर पालिका प्रशासनाची मेहरबानी बघून मात्र अन्य कर्मचारी आता यात काही तरी गोलमाल असल्याचेही बोलू लागले आहेत. आता खोब्रागडेंवर काय कारवाई होते हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)