शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

हत्येच्या कटाचा छडा लावण्यात यश

By admin | Updated: March 19, 2015 01:10 IST

इसापूर येथे गेल्या दि. ८ मार्चच्या रात्री शेत झालेल्या विजेश गोपीनाथ लांडगे (३४) या युवकाच्या हत्याकांडात सहभागी असणाऱ्या पाचही आरोपींना पकडण्यात अर्जुनी मोरगाव पोलिसांना यश आले.

इसापूर : इसापूर येथे गेल्या दि. ८ मार्चच्या रात्री शेत झालेल्या विजेश गोपीनाथ लांडगे (३४) या युवकाच्या हत्याकांडात सहभागी असणाऱ्या पाचही आरोपींना पकडण्यात अर्जुनी मोरगाव पोलिसांना यश आले. या घटनेनंतर आरोपी लतीश ओमप्रकाश गजभिये (२९) याने पोलिसांकडे आत्मसमर्पण करून खुनाचा गुन्हा कबूल केला होता. मात्र इतर आरोपी फरार होते.लतीशला अटक केल्यानंतर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल केला. साक्षीदाराकडे पोलिसांनी विचारपूस केली असता आरोपी लतीश गजभिये हा पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे जाणवले. त्यामुळे पोलिसांनी गुप्त माहिती काढून सूत्र हलविले. त्यानंतर इसापूर गावातील एका साक्षदाराने मृतक विजेश लांडगे याला मारण्याचा कट दि.८ मार्च रोजी काही लोकांनी केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी खात्री करून या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या मेघनाथ गजभिये (२१) रा.कन्हारगाव याला अटक केली. अटक केलेल्या दोन्ही आरोपींकडे कसून चौकशीदरम्यान मृत विजेश यास दि. ८ मार्च १५ रोजी जिवानिशी ठार मारण्याचा कट दोन आरोपी व त्यांच्या साक्षीदाराकडून आखण्यात आल्याचे उघड झाले. तपासादरम्यान पोलिसांनी मृतक विजेश सोबत सिरोली येथे लावणीचा कार्यक्रम पहाण्यासाठी कोण आले होते याबाबत सखोल तपास केला. त्यानंतर एक इसम विजेशसोबत लावणी कार्यक्रम पहाण्यासाठी गेला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. पुन्हा संशयित इसमांकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी आरोपी ओमप्रकाश गजभिये (५५) रा. पुयार, झकेश उर्फ चंद्रकांत गजभिये (२८) रा. चंद्रपूर यांना अटक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी गुन्ह्यात भादंवि कलम ३०२, १२० (ब), ३४ (फौजदारी कट रचून ठार मारणे) कलम वाढविण्यात आली. अटकेतील आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच ३४/एसी-५५१९) व (एमएच ३६/आर-१७३३) या दोन दुचाकी, मिरची पावडर, इडियाडोह मुख्य कालव्यात टाकलेली बांबूची काठी जप्त केली. या कटानंतर इतर आरोपींना अटक होवू नये या उद्देशाने मुख्य आरोपी लतीश याने गुन्हा कबूल करून पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी आरोपींना गजाआड करण्यात यश मिळविले.बुधवारी पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडी मागितली असता न्यायालयाने न्यायालय कोठडी दिली. त्यांची तुरुंगात रवानगी केली. पुढील या गुन्ह्यात पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजेश गज्वल, सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस नाईक गजानन शिंदे, रोशन गोंडाणे, विनोद बिल्लोरे, मुकेश थेर, लोथे, कोरेटी व इतर चमूने परिश्रम घेतले.